दुचाकी, तिनचाकी व चारचाकी वाहनांचा 22 रोजी लिलाव

On: April 20, 2021 9:50 PM

जळगाव : जळगाव शहर पोलिस उपविभागातील एमआयडीसी , शनीपेठ, रामानंद नगर, जळगाव शहर व जिल्हापेठ या पाच पोलिस स्टेशनमधे आतापर्यंत बेवारस मिळून आलेल्या 176 दुचाकी, तिनचाकी व चारचाकी वाहनांचा लिलाव होणार आहे. सदर लिलाव एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या मागील मैदानावर 22 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजेपासून होणार आहे. इच्छुक नागरिकांनी या लिलावात भाग घेण्यासाठी निर्धारीत तारखेला व वेळेवर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लिलावात खरेदी करुन मिळालेल्या वाहनांची किंमत लिलाव संपताच जमा करायची आहे. त्यामुळे ती रक्कम सोबत आणावी लागणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment