पोलिसांच्या सतर्कतेने डीपीच्या आगीवर नियंत्रण

On: April 25, 2021 4:14 PM

जळगाव : जळगाव एमआयडीसी परिसरातील गुरांच्या बाजारानजीक आज 25 एप्रिल रोजी दुपारी इलेक्ट्रीक डीपीला आग लागल्याची घटना घडली. यावेळी सुदैवाने एमआयडीसी पोलिस स्टेशनचे हे.कॉ. गफुर तडवी व पो.कॉ. सुधीर साळवे असे दोघे गस्त घालत होते. त्यांचे या आगीकडे लक्ष गेल्याने त्यांनी तात्काळ याप्रकरणी पोलिस स्टेशनला कळवले. लागलीच अग्नीशमन विभागासह संबधीत विज विभागाला याप्रकरणी माहिती देण्यात आली. माहिती मिळताच या भागातील विजपुरवठा खंडीत करण्यात आला. काही वेळातच अग्नीशमन दलाच्या कर्मचा-यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने कुठलीही प्राणहाणी झाली नाही. सुटीचा दिवस व संचारबंदी असल्यामुळे या भागात वर्दळ कमी होती. दोघा पोलिसांच्या सतर्कतेने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले अन्यथा या आगीने मोठे स्वरुप घेतले असते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment