पत्नीची हत्या करणा-या पतीस जन्मठेप

On: July 8, 2020 6:37 PM

वणी (यवतमाळ) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिची गळा दाबून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप व एक हजार रुपयांची शिक्षा सुनावण्यात आली. पांढरकवडा अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधिश पी.बी.नाईकवाड यांनी हा निकाल दिला आहे.

अनिल महादेव कुडमेथे  (३२) असे आरोपी पतीचे नाव आहे.  वणी तालुक्यातील पेटूर येथील तो रहिवासी आहे. १८ मार्च २०१७ रोजी आरोपी अनिल कुडमेथे याने त्याची पत्नी सुषमा (२५) हिचा चारित्र्यावर संशय घेत गळा दाबून खून केला होता.

आरोपी अनिलचे वडिल महादेव कुडमेथे यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या गुन्हयाचा तपास वणी पोलीस स्टेशनचे तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक संगीता हेलोंडे यांनी केला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment