समाजसेवीकेने घराबाहेर कमावले गुडविल ! पुजाअर्चेला गेली अन गमावून बसली शील !!

जळगाव : विवाहित रेश्मा (काल्पनिक नाव) दिसायला देखणी होती. तिला सामाजिक कार्यात सहभाग घेण्याची भारी हौस होती. बिड शहरात सासरी राहणाया रेश्माने वयाची पस्तिशी गाठली होती. पस्तिशीतही दोन मुलांची आई असलेल्या रेश्माचे रुप वाखाणण्याजोगे होते. सामाजिक कार्याची आवड आणि त्यानिमित्ताने सकाळपासून सायंकाळपर्यंत ती घराच्या बाहेरच रहात असे. सर्वाधिक वेळ घराबाहेर जात असल्याने रेश्माचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढला होता.
सतत घराबाहेर राहणाया रेश्माच्या दिनक्रमासह इतर घरगुती कारणाने सरकारी नोकर असलेल्या पतीचे तिच्यासोबत नेहमी खटके उडत होते. घराबाहेर सामाजीक काम करतांना तिचा दिवस हसत खेळत निघून जात होता. मात्र घरी आल्यावर पतीसोबत होणाया वादामुळे ती वैतागून जात असे. बाहेर समाजात तिची तेजी असली तरी घरात मात्र मंदी होती.
करनी सेना या सामाजिक संघटनेचे काम ती जोमाने करत होती. या संघटनेच्या एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून किशोर सटवाजी जोशी (शास्त्री) या पुजाअर्चा करणाया बाबाची तिला माहिती मिळाली. पुजाअर्चा करुन तो महिलांचा कौटूंबिक त्रास कमी करण्याचे काम करत असल्याचे तिला समजले. किशोर जोशी हा मुळ जामनेर येथील रहिवासी होता. मात्र कामानिमित्त तो जळगाव येथील अयोध्या नगर भागात रहात होता. पुजाअर्चेच्या माध्यमातून आपला कौटूंबिक त्रास कमी करण्यासाठी तीने किशोर जोशीची भेट घेण्याचे ठरवले.
डिसेंबर 2018 मधे ती जळगावला किशोर जोशीच्या भेटीसाठी आली. भेट परिचय झाल्यानंतर किशोर जोशी याने रेश्माला सांगितले की तुमच्यासाठी सन 2018 हे वर्ष लाभदायक नसून त्रासदायक आहे. आगामी सन 2019 हे वर्ष तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. त्यासाठी तुम्हाला पुजाअर्चा करावी लागेल. चर्चेअंती पुजाअर्चा करण्यासाठी नववर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी 2019 रोजी औरंगाबाद येथील एका महागडया हॉटेलात पुजाअर्चा करण्याचे निश्चित झाले.
1 जानेवारी 2019 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्या हॉटेलात समाजसेवीका रेश्मा त्याला भेटण्यासाठी गेली. सर्व नियोजन झाल्यानंतर रात्री 9 वाजेच्या सुमारास पुजेला सुरुवात केली. सुमारे दोन तास पुजाअर्चा झाली. पुजा झाल्यानंतर किशोर जोशी या बाबाने रेश्माला थकवा घालवण्यासाठी कॉफी पिण्यास दिली.
कॉफी पिल्यानंतर रेश्माला लवकरच गुंगी येवू लागली.
कॉफीत काहीतरी गुंगीचे औषध मिसळण्यात आले होते. कॉफी पिल्यानंतर काही वेळातच रेश्मा बेडवर आडवी झाली. तिला काहीही सुचत नव्हते. ती बेडवर पसरताच किशोर जोशी याने तिच्या अंगावरील कपडे बाजुला सारले. तिच्या निर्वस्त्र अंगावरुन त्याने हात फिरवण्यास सुरुवात केली. दरम्यान या सर्व घटनाक्रमाचा त्याने त्याच्या मोबाईलमधे व्हिडीओ तयार करण्याची सेटींग लावून ठेवली होती.
मध्यरात्री केव्हातरी तिला अचानक जाग आली. त्यावेळी तिच्या लक्षात आले की आपल्या अंगावरील कपडे अस्ताव्यस्त झालेले असुन अंगाची जळजळ होत आहे. आपल्यासोबत अतिप्रसंग झाल्याची तिला जाणीव झाली. तिने याबाबत किशोर जोशी यास विचारणा केली. तुम्ही माझ्यासोबत काय केले? मी बाहेर जावून लोकांना ओरडून सांगते असे ती त्याला म्हणू लागली. त्यावर त्याने तिला शांत राहण्यास सांगितले. तिच्यासोबत लगट केल्याचा व्हिडीओ त्याने तिला दाखवला. व्हिडीओ क्लिप मधे तो तिच्या निर्वस्त्र अंगावरुन हात फिरवत होता. ती व्हिडीओ क्लिप बघून तिच्या मनाला धक्काच बसला. ती मनातून घाबरली. त्याने तिला म्हटले की आरडाओरड करु नको नाहीतर हि व्हिडीओ क्लिप मी तुझ्या पतीला दाखवेल तसेच सोशल मिडीयावर देखील व्हायरल करेन.
त्याच्या धमकीमुळे ती गप्प बसली.
त्याच्या धमकीमुळे तिला त्या हॉटेलवर तिन दिवस मुक्कामी रहावे लागले. या तिन दिवसात किशोर जोशी याने तिच्यासोबत बळजबरी शरीरसंबंध केले. सलग तिन दिवस शरीरसंबंध झाल्याने तिचे अंग ठणकत होते. यावेळी पतीशिवाय तिचे विवाहबाह्य संबंध निर्माण झाले होते.
त्यानंतर 4 जानेवारी 2019 रोजी ती औरंगाबाद येथून आपल्या घरी बिड येथे परत आली. सलग तिन दिवस रेश्मा सोबत शरीरसंबंध निर्माण केल्यामुळे किशोर जोशी यास तिच्या शरीराची चटक लागली होती. कसेबसे 15 दिवस गेल्यानंतर त्याने तिला फोन करुन सांगितले की तु तुझ्या पतीचे घर सोड आणि दुसया भाड्याच्या घरात राहण्यास ये, नाहीतर तुझ्यासोबत तयार केलेली ती व्हिडीओ क्लिप मी तुझ्या पतीला दाखवेन. किशोर कडून मिळालेल्या धमकीमुळे ती पुन्हा घाबरली. त्यामुळे नाईलाजास्तव तिने बिड शहरात दुसया ठिकाणी भाड्याचे घर घेतले. तिने भाड्याचे घर घेताच तो तिच्यासोबत त्या घरात राहण्यास आला. तो येथे देखील तिच्यावर अत्याचार करु लागला.
ती क्लिप व्हायरल करण्याच्या धाकाने ती गप्प बसून त्याचा लैंगिक अत्याचार सहन करत होती.
घाबरुन तिने हा प्रकार कुणाला सांगितला नव्हता.
त्याचा गैरफायदा घेत त्याने तिला दादर, मुंबई, दिल्ली बिड येथील भाड्याने घेतलेल्या घरात तसेच इंदोर, भिलवाडा राजस्थान या विविध ठिकाणी नेवून वेळोवेळी तिच्यावर शरीरसंबंध निर्माण केले.
28 डिसेंबर 2019 पासून किशोर याने त्याचा मुलगा सुमित जोशी याच्या न्यायालयीन कामकाजात मदत करण्यासाठी जळगाव येथे बोलावून घेतले. तेव्हापासून ती जळगाव येथे त्याच्या सोबत रहात आहे. येथेही किशोर याने वेळोवेळी शरिरसंबंध निर्माण केले. गेल्या 9 मार्च रोजी किशोरच्या दत्तक मुलीसोबत रेश्मा फोनवर बोलत होती. हा प्रकार त्याला माहित पडताच त्याला राग आला.
त्यने तिला चापटाबुक्क्यांनी मारहाण केली.
अखेर कंटाळून तिने नजिकचे एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठले.
सर्व प्रकार तिने पोलिस निरिक्षक रणजित शिरसाठ यांना भेटून कथन केला.
या प्रकरणी तिने दिलेल्या फिर्यादीनुसार किशोर जोशी याच्या विरुद्ध बलात्कारासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरिक्षक रणजित शिरसाठ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक संदिप हजारे त्यांचे सहकारी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here