शिला सुर्यवंशी यांचा कॉंग्रेस प्रवेश

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा कॉंग्रेस पक्षात इनकमिंग सुरु झाले आहे. पाचोरा शहराच्या सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या शिला सुर्यवंशी यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

पाचोरा शहरातील सामाजिक कार्यात महीला म्हणून स्वतः ची ओळख निर्माण करणार्‍या शीलाताई हरीश सुर्यवंशी यांनी धर्मनिरपेक्ष विचार धारेच्या तसेच देशाला स्वातंत्र्य मिळून देणार्‍या कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. जिल्हा सरचिटणीस कुसुमताई पाटील यांनी त्यांचे स्वागत करुन त्यांना पक्ष प्रवेश दिला. याप्रसंगी महीला तालुका अध्यक्षा अॅड. मनिषा पवार, जिल्हा उपाध्यक्षा संगिताताई नेवे, तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, जेष्ठ पदाधिकारी शेख इस्माईल शेख फकीरा, जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, कृ. उ. बा. समिती प्रशासक प्रा. एस डी पाटील, जिल्हा अल्पसंख्याक सचिव इरफान मनियार, तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शरीफ खाटीक, रेशनिंग कमिटी अध्यक्ष राजु महाजन, प्रकाश सोनवणे, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, इस्माईल तांबोळी, आरोग्य सेवा सेल तालुका अध्यक्ष डॉ फिरोज शेख, शरीफ शेख, शंकर सोनवणे, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गिरी, आबीद शेख, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, प्रवीण पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले आदींची उपस्थिती होती.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here