विकास दुबेच्या साथीदारांना विमानाने नेणार कानपूरला

ठाणे :  आठ पोलिसांचे प्राण घेणा-या विकास दुबेच्या साथीदारांना मुंबई ते कानपूर विमानाने घेवून जाण्यास न्ययालयाने सहमती दर्शवली आहे. विकास दुबे याचे साथीदार अरविंद त्रिवेदी उर्फ गुहन रामविलास त्रिवेदी आणि सुशीलकुमार उर्फ सोनू सुरेश तिवारी यांना ताव्यात घेण्यासाठी उत्तरप्रदेशचे पोलिस ठाणे येथील न्यायालयात दाखल झाले होते. दोन्ही साथीदार आरोपींना 6 जुलैपर्यंत ट्रान्झिट रिमांड सुनावण्यात आला आहे. 

मुंबई एटीएसने त्रिवेदी आणि सोनू तिवारी यांना हवाई मार्गाने घेवून जायचे का, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर कोर्टाने सहमती दर्शवली असून दोघा आरोपींना आज मुंबई ते कानपूर विमानाने घेवून जाण्याचे ठरले आहे.

उत्तर प्रदेशमधील कुविख्यात गुंड विकास दुवेचे दोन साथीदार अरविंद त्रिवेदी उर्फ गुहन रामविलास त्रिवेदी आणि सुशील कुमार उर्फ सोनू सुरेश तिवारी यांना शनिवारीच ठाण्यातून अटक केली आहे. त्यांना रविवारी ठाण्याच्या विशेष सत्र न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्या. रश्मी झा यांनी दोघा आरोपीतांना 21 जुलै पर्यंत न्यायालयीन कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. मात्र या दोन्ही आरोपींनी आपला देखील एन्काऊन्टर होण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे आपल्याला हवाई मार्गे उत्तर प्रदेशात न्यावे अशी त्यांनी मागणी केली होती.

5

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here