जात पंचायतीचा वाढतच गेला त्रास ; त्रस्त मानसीने घेतला अखेर गळ-फास

जात
पंचायतीचा वाढतच गेला त्रास
त्रस्त
मानसीने घेतला अखेर गळ-फास

जळगाव
: जात जात नाही ती जात असे कित्येकदा म्हटले जाते. जाती साठी खावी माती असे देखील
कित्येकदा म्हटले जाते. आपल्या समाजात जात व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात
महत्व
आले आहे. “जात” या घटकावर आपल्या देशात निवडणूका देखील जिंकल्या जातात. एखादा बडा
अधिकारी अथवा नेता कोणत्या जातीचा आहे व त्याच्या जातीचा आपल्याला कसा फायदा करुन
घेता येईल याचे गणित मांडणारे लोक देखील आपल्याला समाजात दिसून येत असतात. अशी ही
जात व्यवस्था पुर्वापार सुरु आहे. या जात व्यवस्थेमुळे कित्येक आंतरजातीय विवाह
जुळण्यास अडचणी येत असतात. समाजात रुढ असलेली जात व्यवस्था मोडीत निघावी अथवा
संपुष्टात यावी असे कुणाला वाटत असले तरी ते सहजासहजी शक्य होणार नाही असे एकंदरीत
व्यावहारीक विचार केल्यावर आपल्याला दिसून येते.

आपल्या
लोकशाही देशात अजुनही काही समाजात जात पंचायत असल्याचे दिसून येते. कित्येक जात
पंचायतींना कायद्याच्या पातळीवर मान्यता नाही. असे असले तरी त्या त्या समाजातील
जात पंचायतीचा निर्णय त्या त्या समाजातील लोकांना मान्य करावा लागतो. नाहीतर अशा
लोकांना समाजातून वाळीत टाकले जाते. त्यामुळे समाजातील उपवर तरुण अथवा उपवधू तरुणींना
लग्न जुळण्यास अडचणी येत असतात. काही जात पंचायतीत सरपंच आपली मनमानी करुन हेतू
पुरस्सर एखाद्याचा छळ करत असतात.
जळगाव
शहरात कंजर भाट समाज वास्तव्याला आहे. या समाजातील एका तरुणीने आपल्या लग्नात अडसर
ठरत असलेल्या जात पंचायतीच्या छ्ळाला कंटाळून आपली जिवनयात्रा संपवण्याची दुर्दैवी
घटना नुकतीच जळ्गावला घडली. याचा सविस्तर वृत्तांत  पुढीलप्रमाणे आहे.
जळगाव
शहरातील रहिवासी
बरकत
अताऊल्ला पठाण व इर्षादबी बरकत पठाण यांची
बानोबाई ही कन्या आहे.
बानोबाई लग्नायोग्य झाल्यानंतर परिसरात राहणा-या आनंद दिनकर बागडे या तरुणासोबत तिची
ओळख झाली. दोघे एकमेकांच्या सहवासात आले व त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले. त्यांनी प्रेमाच्या
आणाभाका घेत सोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. बानोबाई आणि आनंद बागडे हे
दोघे भिन्न जाती – समाजाचे होते. बानोबाई ही मुस्लिम तर आनंद हा कंजरभाट समाजाचा
होता. दोघांनी एकमेकांसोबत विवाह करण्याचा ठाम निर्णय घेतला होता. दोघांच्या
विवाहाला सामाजिक विरोध हा ठरलेला होता. दोघांच्या विवाहाला आनंदचे वडील दिनकर
रणजीत बागडे यांचा तिव्र विरोध होता. हा विरोध झुगारुन सन 2000 मधे दोघांनी जळगाव
शहरापासून जवळच असलेल्या तरसोद येथील गणपती मंदीरात विवाह केला. लग्नाचे वेळी आनंद
हा अमळनेर येथे रहात होता व भडगाव येथे विज वितरण कंपनीत कामाला होता.
बानुबाई
सोबत लग्न झाल्यानंतर देखील त्याचे वडील दिनकर रणजीत बागडे यांचा त्या लग्नाला विरोध
कायम होता. आनंदने आपल्या समाजातील मुलीसोबत दुसरा विवाह करावा अशी त्यांची इच्छा
होती. वडिलांचा तगादा सुरुच असल्यामुळे आनंद त्रस्त झाला होता. त्याने वडीलांची
इच्छा बानोबाईला सांगीतली. आनंद हा त्याची पत्नी बानोबाईला सुखात ठेवत असल्यामुळे
तिने त्याला दुसरे लग्न करण्यास होकार दिला. बानोबाईसोबत लग्न केल्यानंतर अवघ्या
तिन महिन्यातच आनंदचे कंजरभाट समाजातील मुलीसोबत दुसरे लग्न झाले. त्याचे वडील
कंजरभाट जात पंचायतीचे सरपंच होते.
अशा
प्रकारे आनंदचे एकाच वेळी दोन संसार सुरु होते. दिवसामागून दिवस जात होते. पहिली
पत्नी बानोबाईपासून आनंद यास दोन मुली झाल्या. त्याच्या पहिल्या मुलीचे नाव मानसी
व दुस-या मुलीचे नाव काजल असे ठेवण्यात आले. दुस-या पत्नीपासून आनंद यास दोन मुले
झाली. त्यांची नावे तुषार व उमंग अशी ठेवण्यात आली.
बघता
बघता दोन तपाचा कालावधी लोटला. या कालावधीत बानोबाईच्या दोन्ही मुली मोठ्या
झाल्या. त्या महाविद्यालयीन शिक्षण घेवू लागल्या. बानोबाई व आनंदचे वादविवाद होवू
लागल्याने ती दोन्ही मुलींसोबत तिचा दिर विजय बागडे याच्याकडे येवून राहू लागली.
बानोबाईची
मोठी मुलगी मानसी आता विवाहयोग्य झाली होती. बानोबाई दुस-या समाजाची असल्यामुळे
तिचे सासरे (पती आनंदचे वडील) तथा जातपंचायतीचे सरपंच दिनकर बागडे हे तिचा व
तिच्या मुलींचा तिरस्कार करतच होते. आपला मुलगा आनंद याने बानोबाईसह तिच्या दोन्ही
मुलींना सोडून द्यावे अशी त्यांची इच्छा होती.
दरम्यान मानसी उर्फ मुस्कान हिला कोल्हापुर येथील कंजरभाट
समाजाच्या मुलाचे लग्नाचे स्थळ आले होते.
कोल्हापूर
येथील उपवर मुलगा मानसीला बघण्यासाठी जळ्गावला आला होता. त्याला मानसीचे स्थळ
आवडले होते. तो मानसी सोबत लग्न करण्यास तयार होता. २६ जानेवारी रोजी दोघांचा
साखरपुडा करण्याचे निश्चीत झाले होते. या लग्नाला आनंदची देखील सहमती होती.
मानसीचे
लग्न ठरले
असल्याची
माहीती मिळताच जात पंचायतीचे सरपंच तथा बानोबाईचे सासरे दिनकर बागडे संतप्त झाले.
बानोबाई व तिची मुलगी मानसी आपल्या कंजरभाट जातीची नसल्यामुळे त्यांनी या लग्नाला
कडाडून विरोध केला. मानसीचे लग्न कोल्हापूर येथील मुलासोबत होवू नये असा त्यांचा
आग्रह होता. कोल्हापूर येथे दिनकर बागडे यांच्या दोन्ही मुलींचे सासर होते. आनंदची
मुलगी मानसी ही परक्या जातीच्या स्त्रीसोबत केलेल्या प्रेम विवाहातून झाली
असल्याचे समजले तर समाजात आपली बदनामी होईल असे त्यांना वाटत होते. त्यासाठी हे
ठरलेले लग्न मोडून टाकावे असा हेका दिनकर बागडे यांनी लावला होता.
आपले
लग्न मोडले जात असल्याचे बघून मानसी मनोमन नाराज झाली होती. हे स्थळ हातचे जावू
नये असे तिला मनोमन वाटत होते. तिला कोल्हापुर येथील स्थळ पसंत पडले होते. परंतु
तिचे आजोबा दिनकर बागडे या स्थळाला नकार देत होते.
अखेर
तो काळा दिवस उजाडला. 23 जानेवारी रोजी बानोबाईचे दिर विजय बागडे हे काही
कामानिमित्त बाहेर गेले होते. लहान मुलगी काजल ही महाविद्यालयात गेली होती. घरात
मानसीची आई बानोबाई
हजर
होती. त्यावेळी मानसी खुप तणावात आली होती. तिने आई बानोबाईजवळ आपल्या लग्नाबद्द्ल
चिंता व्यक्त केली. त्यावर बानोबाईने तिला धिर देत म्हटले की सर्व काही व्यवस्थीत
होईल
,
तु काही काळजी करु नको.
त्यानंतर
मानसी ही घराच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत निघून गेली. साधारण अर्ध्या तासाने
बानोबाईचा पुतण्या वरच्या मजल्यावरील खोलीत त्याचे कपडे घेण्यास गेला. त्यावेळी ती
खोली आतून बंद होती. त्याने मानसीला आवाज देवून दरवाजा उघडण्यास सांगीतले. मात्र
आतून कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्याने सर्वांना हाका मारुन वर
बोलावले. खोलीचे सर्व दरवाजे आतून बंद होते. सर्वांना काहीतरी अघटीत झाले असल्याची
शंका येवू लागली. त्यांनी किचनच्या दरवाजाच्या फटीतून डोकावून पाहिले असता त्यांना
शॉकच बसला.
मानसी
खोलीच्या छताला लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. तिने खोलीच्या छताला ओढणीच्या मदतीने
गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली होती. सर्वांनी आरडाओरड करत गल्लीतील गणेश नंदु
बागडे
,
आकाश
शंकर बागडे
,
अहमद
मिस्त्री
,
शरद
कसबे अशांना बोलावले. त्यांनी धक्के मारुन तो दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
ओढणीच्या
मदतीने खोलीच्या छ्ताला लटकलेल्या मानसीला खाली उतरवण्यात आले. ती कोणतीही हालचाल
करत नव्हती. तिला तात्काळ एका खास
गी दवाखान्यात नेण्यात आले. तेथील
डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.
दुस-या
दिवशी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे निश्चीत झाले.
आजोबा
दिनकर बागडे यांच्या जात पंचायतीच्या छ्ळाला कंटाळून नात मानसी हिने आत्महत्या
केली होती. दिनकर बागडे यांचा तिच्या लग्नाला विरोध होता. त्यातून हा सर्व
दुर्दैवी प्रकार झाला होता. मयत मानसी व तिची आई बानोबाई या दोन्ही परक्या
जातीच्या होत्या हेच त्यांचे दुर्दैव होते. परंतू परक्या जातीच्या बानोबाई सोबत
आनंद याने प्रेम विवाह केला होता. त्यातून त्यांना मानसी रुपी कन्या रत्न झाले
होते. हे समजून घेण्यास दिनकर बागडे तयार नव्हते. आपल्याला जातीत घेवून जातगंगा
द्या अशी मानसीने तिचे आजोबा दिनकर बागडे यांना मृत्यूपुर्वी विनंती केली होती.
मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नव्हता. समाजाला व प्रतिष्ठेला ठेच लागण्याच्या
खोट्या नादात त्यांनी मानसीला जणू काही वाळीत टाकले होते.
हा
आत्महत्येचा प्रकार असून देखील दडपणाखाली पोलिसांना कळवण्यात आले नाही. ती
मेल्यानंतर देखील तिचा जाच थांबावा असे जात पंचायतीला वाटले नाही. आईवडीलांनी
आंतरजातीय
,
आंतरधर्मीय विवाह केला असल्याने कंजरभाट जातीत सामावून कुळ
देण्यासाठी पंचायत तयार नव्हती. त्यामुळे कंटाळून मानसीने आत्महत्या केली असल्याचे
बोलले जात होते.
दरम्यान जातपंचायतीच्या जाचाला
कंटाळून मानसीने आत्महत्या केल्याचा आरोप करणारा एक अर्ज पोलिस प्रशासनाला प्राप्त
झाला. मानसीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु असतांना मिळालेल्या माहीतीच्या आधारे
एमआयडीसी
पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक रणजीत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक
अंत्यसंस्कार सुरु असलेल्या ठिकाणी हजर झाले. पथकाने मानसीचे अंत्यसंस्कार रोखले.
तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीकामी सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आला. या
प्रकारामुळे तिच्या होत असलेल्या अंत्यसंकाराला कायद्याची खिळ बसली. उत्तरीय
तपासणीत मयत मानसीने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. अशा प्रकारे तिच्या
आत्महत्येला नैसर्गीक मृत्यूचे स्वरुप देण्याचा डाव फसला होता.
उत्तरीय तपासणी नंतर तिच्या मृतदेहावर
अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुस्कानच्या मृत्यूनंतरही जातपंचायतीने तिच्या वडिलांकडून
समाजाच्या पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी रोख 15 हजार रुपयांचा दंड घेऊन जातगंगा
दिल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला होता. या आशयाचे पत्र महात्मा फुले जीवनदायी आरोग्य
योजनेचे उपसंचालक कृष्णा इंद्रेकर यांनी एमआयडीसी पोलिसांना दिले असल्याची माहीती
पुढे आली.
तिचे अंत्यसंस्काराचे सोपास्कर आटोपल्यानंतर 25 जानेवारी रोजी मयत
मानसीची आई बानोबाईने आपल्या नातेवाईकांसह एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठले. तिने
मानसीचे आजोबा व जात पंचायतीचे सरपंच दिनकर बागडे यांच्या विरोधात मुलगी मानसीच्या
आत्महत्येप्रकरणी रितसर गुन्हा दाखल केला.
मानसीला
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सदर फिर्याद दाखल करण्यात आली.
या
प्रकरणी महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन
गोराणे यांनी आपली तिव्र प्रतिक्रिया माध्यमांसमोर व्यक्त केली.
महाराष्ट्रातील
विविध जाती पोटजातीत जातपंचायती छुप्या पद्धतीने आजही कार्यरत आहेत. अशी एखादी क्रुर
घटना घडली तरंच जातपंचायतीची दाहकता लक्षात येते. लोकशाहीतील न्यायव्यवस्थेला
आव्हान देणा-या या निर्दयी कळपाच्या विरोधात काहीतरी कठोर कारवाई व्हायला हवी
अस समाजप्रेमी माणसांना या
घटनेच्या निमीत्ताने वाटू लागते. सहा वर्षापुर्वीच्या भुतकाळात डोकावून पाहीले
असता एक घटना आपल्या निदर्शनास येते. नाशिक येथील गरोदर मुलीचा तिच्या पित्यानेच
जातपंचायतीच्या मनमानी जाचाला कंटाळून दोरीने गळा आवळून खून केल्याची पहिली घटना
जून 2013 मध्ये घडली होती. ती घटना महाराष्ट्र अंनिस च्या कार्यकर्त्यांनी
पाठपुरावा करून उघडकीस आणली होती. जातपंचायतींच्या मनमानी विरोधात प्रबोधनात्मक
पहिली राज्य परिषद नाशिक येथे ऑगस्ट 2013 मधे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या
अध्यक्षतेखाली झाली होती. त्यानंतर महाराष्ट्र अंनिसच्या सततच्या पाठपुराव्यामुळे
महाराष्ट्र शासनाने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा
 मंजूर
केला. समितीने स्वखर्चाने त्याबाबतची प्रशिक्षण शिबीरे आणि लोकप्रबोधन कार्यक्रम
केले. मात्र अजूनही विविध जाती
, पोटजातीत जातपंचायती छुप्या पद्धतीने त्यांचे
क्रुर
,
अन्यायकारक
न्यायनिवाडे करून

प्रचलित
न्यायव्यवस्थेला झुगारून आपल्याच
 जातबांधवांचे
विविध प्रकारचे शोषण करतात. प्रचलित न्यायव्यवस्थेपर्यंत जात बांधवांना न्याय
मागण्यासाठी जाऊ देत नाहीत.जाती
, पोटजातीचे विशेषतः सर्व धार्मिक, सांस्कृतिक
कार्यक्रम
,
रुढी,परंपरा
स्वत:च्या हाती ठेवून
,
कुणी
थोडा जरी विरोध केला किंवा कळत
, नकळत चालीरीती,परंपरा
मोडण्याचा प्रयत्न केला की
,
जातपंचायतीची
मनमानी सुरू होते. त्या व्यक्तीला
, तिच्या कुटुंबातील सदस्यांसह, त्यांच्याशी
संबंध ठेवणाऱ्याला जातीपोटजातीतून बहिष्कृत केले जाते. सर्वप्रकारची बंधनं टाकून
, जिवंतपणी
मरण यातना दिल्या जातात.त्यातून आत्महत्या
,खून घडतात.
कायदा
होऊन ही हे पुर्णपणे थांबले नाही
, यासाठी पुढील काही ठळक बाबी अंमलात आणणे
आवश्यक आहे.

कायदा
लागू झाला पण त्यासाठी आवश्यक ते नियम शासनाने तातडीने करणे आवश्यक आहे. शिवाय
शासकीय पातळीवरून कायदा प्रबोधन अभियान राबविण्यात आले तर पिडीतांना धाडस
, आधार
मिळून

ते
तक्रार दाखल करण्यासाठी धजावतील.
त्या त्या जाती पोटजातीतील युवक, युवतींनी
जातपंचायतीच्या मनमानीला चाप लावण्यासाठी संघटीतपणे पुढे आले पाहिजे. जातपंचाचे
अन्यायकारक न्यायनिवाडे संघटीत होऊन झुगारून दिले पाहिजेत.विविध राजकीय पक्षांच्या
नेत्यांनी त्यांच्या पक्षात असलेल्या त्या त्या जाती
, जमातीच्या
आपल्या कार्यकर्त्यांना
,
पदाधिका-यांना
त्यांच्या जाती पोटजातीतील जातपंचायतीच्या मनमानीला चाप लावण्यासाठी जाणिवपूर्वक
लोकांपर्यंत जाण्यास सांगितले पाहिजे.जातपंचांशी संवाद करून
, प्रसंगी
कडक समज देऊन
,प्रचलित
न्यायव्यवस्थकडे दाद मागण्याकरिता मन वळविले पाहिजे. पिडीतांना दिलासा दिला
पाहिजे.

विविध
लोकचळवळीच्या नेत्यांनी
,
कार्यकर्त्यांनी
सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा अंमलबजावणी साठी जाणिवपूर्वक लोकांपर्यंत कायदा
पोहोचवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत.पिडितांना शक्य ते सर्व सहकार्य
, आधार
मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
आतापर्यंत उघडकीस आलेल्या
घटनांमधून हे दिसून येते की
, जातपंचायतीच्या मनमानीला जास्त करून
महिलाच बळी ठरलेल्या आहेत.त्यासाठी विशेषतः महिला संघटनांची जबाबदारी अधिक
वाढते.अर्थातच त्यांना पाठिंबा
,बळ देण्यासाठी समाजातील सेवावृत्तीचे
महिला
,
पुरूष, लोकचळवळी,शासन, पोलिस
प्रशासन यांनी सदैव तत्पर असलं पाहिजे.

अनेक
राजकीय पक्षांचे विविध जातीपातीचे नेते
, पुढारी त्या त्या जाती पोटजाती चे
मेळावे
,
परिषदा
नेहमीच घेतात.खरं तर तो जातबळकटीकरणाचाच बेकायदेशीर कार्यक्रम असतो.शिवाय मतांचे
राजकारण असल्याने तेथे उपस्थित असलेल्या जातपंचायतींच्या सदस्यांबाबत हे नेते
, पुढारी
काही बोलत नाही.त्यामुळे जातपंचायतीच्या मनमानीला रान मोकळे होते.जातपंचांचे आणि
अशा राजकीय व्यक्तींचे सर्व प्रकारचे लागेबांधे बळकट होत जातात.म्हणून त्या त्या
जाती पोटजातीतील सामान्य माणूस इच्छा असूनही जातपंचायतीच्या मनमानीला आळा घालू शकत
नाही.त्यासाठी जातपंचायतींच्या सदस्यांबाबत कायदेशीर कारवाई करताना
,त्यांचे
राजकीय लागेबांधे खोलात जाऊन तपासले पाहिजेत.जातपंचांना सहकार्य
, सरक्षण
करणा-यांना कायद्याच्या कचाट्यात आणले पाहिजे.त्यासाठी पोलिस प्रशासनाला संपूर्ण
मुभा दिली पाहिजे.
एखादी
व्यक्ती वा व्यक्तींचा समूह तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांच्यावरील सामाजिक बहिष्काराला
बंदी घालणारा कायदा 3 जुलै 2017 पासून महाराष्ट्रात अंमलात आला आहे. जादूटोणा
विरोधी विधेयकानंतर सामाजिक बहिष्कारासंदर्भात अस्तित्वात आलेल्या दुसऱ्या सामाजिक
सुधारणेच्या कायद्याने अंनिसच्या लढ्याला यश मिळाल्याची माहिती अंनिसचे राज्य
प्रधान सचिव माधव बावगे यांनी दिली आहे.
सामाजिक बहिष्कारावर बंदी
आणण्याकरिता महाराष्ट्र विधिमंडळाने मंजूर केलेल्या कायद्याला 20 जून 2017 रोजी
राष्ट्रपतींनी संमती दिली असून
, 3 जुलै रोजी सदर
अधिनियम महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा कायदा
महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण (प्रतिबंध बंदी व
निवारण) अधिनियम 2016
या नावाने ओळखला जाईल. जातपंचायत व
अन्य माध्यमातून सामाजिक बहिष्कारामुळे व्यक्ती वा समुहाच्या मूलभूत अधिकारांचे
हनन होते. या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक दिवंगत डॉ. नरेंद्र
दाभोळकर यांनी प्रदीर्घ लढा दिला.
नाशिकमध्ये जातपंचायतीचे प्रकरण
समोर आल्यानंतर डॉ. दाभोळकर यांनी 8 ऑगस्ट 2013 रोजी जातपंचायतीच्या विरोधात परिषद
घेतली होती. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी लातूर येथे परिषद झाली. आता सामाजिक बहिष्कार
बंदी कायद्यामुळे प्रत्येक जिल्हयात सामाजिक बहिष्कार बंदी अधिकारी नियुक्त होतील
,
असेही प्रधान सचिव बावगे यांनी सांगितले. सदर अधिकारी सामाजिक
बहिष्कार अपराधांचा शोध घेतील. भादंवि कलम 34
, 120 (क),
120 (ख), 149, 153 (क),
383 ते 389 तसेच 511 अन्वये अपराध सिद्ध झाल्यास दोषारोपपत्र दाखल
होईल.
>समाजातून वाळीत टाकण्याला बसणार प्रतिबंध
समाजातील कोणत्याही सदस्याला
सामाजिक
, धार्मिक, सामूहिक कार्यक्रम
तसेच समाज मेळाव्यात प्रतिबंध करणे
, विवाह, अंत्यविधी वा इतर विधी संस्कार पार पाडण्यासाठी समाजातील सदस्याचा हक्क
नाकारणे
, कोणत्याही कारणावरून वाळीत टाकण्याची व्यवस्था करणे,
समाजातील व्यक्तीचे व्यावसायिक तसेच व्यापारविषयक संबंध तोडण्यासाठी
प्रवृत्त करणे
, समाजातून काढून टाकण्याची व्यवस्था करणे अशी
अनेक कृत्ये सामाजिक बहिष्कार बंदी कायद्याअंतर्गत अपराध ठरतील.
>भादंवि कलम ३४, १२० (क),
१२० (ख), १४९, १५३ (क),
३८३ ते ३८९ तसेच ५११ अन्वये अपराध सिद्ध झाल्यास दोषारोपपत्र दाखल
होणार असून त्यानंतर त्याचा खटला चालेल.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here