धान्य उत्पादक शेतक-यांची अवस्था बिकट – राजकुमार बडोले

गोंदीया (अनमोल पटले) : धान्य उत्पादक शेतक-यांची अवस्था अतिशय बिकट असून त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना वेळ नसल्याचे भाजपाचे माजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी म्हटले आहे. शेतक-यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गोंदीया जिल्ह्यात आले असतांना ते बोलत होते.

गोंदीया जिल्ह्यातील अर्जुनी मोर, सडक अर्जुनी, गोरेगाव व गोंदिया तालुक्यातील धान्याच्या नुकसानाची स्थिती पाहण्यासाठी त्यांनी दौरा केला होता. त्यावेळी ते बोलत होते. नवेगांव बांध, परसोडी रैयत, खोबा, पाटेकुरा, मुंडीपार, कोरणी येथील शेतक-यांच्या शेतातील पिकांची पाहणी त्यांनी केली. शेतक-यांनी कष्टाने उभे केलेले पिक गाद, करपा, मावा या रोगानी नष्ट झाले आहे. यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावली नाही. त्यामुळे जवळपास तिस टक्के पेरणी झाली नाही.

शेतक-यांना पिक कर्ज मिळाले नाही त्यामुळे त्यांनी नाईलाजाने सावकाराकडून कर्ज घेत पेरणी केली. मात्र शेतक-यांना सरकारकडून पिक कर्ज मिळाले नाही. ज्या पिकांच्या भरवशावर शेतक-यांनी सावकाराकडून कर्ज घेतले ते पिक गाद करपा या रोगाने नष्ट केले. अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. गोंदीया जिल्ह्याच्या दौ-यावर आलेले माजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी पुढे बोलतांना म्हटले की सध्याच्या पालकमंत्र्यांना गोंदीया जिल्ह्यासाठी वेळ नाही. धान्य कसे लावतात हे त्यांना माहिती नाही. निवडणूका आल्या म्हणजे त्यांना शेतक-यांची आठवण येते. भाजप सत्तेत असतांना शेतक-यांचे नुकसान झाले म्हणजे सरासरी वीस टक्के भरपाई देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. सगळ्या शेतक-यांची वर्ग दोन जमीन वर्ग एक करण्याचा क्रांतिकारी निर्णय भाजपच्या कार्यकाळात घेण्यात आला. त्या काळात 16 क्विंटल प्रती एकरी धान्य घेतले तेव्हा वीस टक्के नुकसान भरपाई देण्यात आली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here