प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या

काल्पनिक छायाचित्र

यवतमाळ : अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या पतीचा त्याच्याच पत्नीने प्रियकराच्या साथीने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हत्येला आत्महत्या दाखवण्याचा दोघा संशयीतांकडून प्रयत्न करण्यात आल्याचे देखील उघड झाले आहे. मात्र काही तासातच पोलिसांनी याप्रकरणी दोघा संशयीतांना अटक करत खरा प्रकार उघड केला आहे.

सोमवारच्या मध्यरात्री बिटरगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सावळेश्वर या गावी सदर घटना घडली. भीमराव उत्तम काळबांडे (30), रा. सावळेश्वर असे मयताचे नाव आहे. उमरखेडचे डिवायएसपी आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिटरगावचे पोलिस निरीक्षक प्रताप भोस, उपनिरिक्षक कपिल मस्के, जमादार रवि आडे, मोहन चाटे, सतीष चव्हाण, गजानन खरात, देविदास हाके, होमगार्ड चद्रमणी वाढवे यांनी तपासकामात सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here