दरोड्याच्या तयारीतील गुन्हेगारांची टोळी जेरबंद

नाशिक : लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकाने दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला जेरबंद केले आहे. रात्र गस्तीदरम्यान रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाणा-या वाहनांच्या तपासणीत एक कार संशयास्पद आढळून आली. त्या कारची (एमएच 12 एमबी 4071) तपासणी केली असता त्यात दरोडा टाकण्याचे साहित्य आढळून आले.

इंडिका कारसह सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. साबीर कुरेशी, सर्फराज शेख, कुर्बान शेख, सनीराज ढोकणे, संदीप कांबळे (कार चालक), योगराज सोनवणे (सर्व रा. श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे.कॉ. प्रदीप आजगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. श्रीरामपूर व अहमदनगर येथे या टोळीविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. स.पो.नि. राहुल वाघ, उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, सहायक उपनिरीक्षक शिवाजी घोडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here