वन मॅन आर्मी दुकानफोडीत प्रविण होता अट्टल!- त्याच्या अटकेसाठी एलसीबीचे पथक होते अटल!!

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रहिवासी मात्र परजिल्ह्यात एसटीने जावून दुकाने फोडणारा अट्टल गुन्हेगार जळगाव एलसीबीने अटक केला आहे. त्याला पुढील तपासकामी भोकरदन (जिल्हा जालना) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रविण उर्फ पप्पू पाटील असे अटक करण्यात आलेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. तो बिडगाव ता. चोपडा (जिल्हा जळगाव) येथील रहिवासी आहे.

बालपणापासून गुन्हेगारी क्षेत्रात वावरणा-या प्रविण पाटील याने सुरुवातीच्या काळात जळगाव जिल्ह्यात दुकानफोडीचे गुन्हे केले आहेत. त्यामुळे त्याला जळगाव जिल्ह्यातील पोलिस ओळखतात. गुन्हे करतांना आपल्याला कुणी ओळखू नये, आपल्यावर कुणी संशय घेऊ नये यासाठी परजिल्ह्यात दुकाने फोडण्याची शक्कल त्याने लढवली. मात्र तो जळगाव एलसीबीच्या हाती लागला. पर जिल्ह्यात दुकान फोडण्याचे गुन्हे तो एकटाच करत होता. कुणाही साथीदारांच्या मदतीविना तो गुन्हे करत होता. एस.टी. ने पर जिल्ह्यात जावून तो अगोदर दुकानांची रेकी करत होता. त्यानंतर रात्रीच्या सन्नाट्यात तो एकटाच दुकाने फोडण्याचे काम करत होता. एखाद्या दुकानात हवा तसा मुद्देमाल मिळाला नाही तर तो परिसरातील इतर दुकाने देखील फोडत होता.

अटक करण्यात आलेल्या प्रविण उर्फ पप्पू पाटील याने जळगाव जिल्ह्यात शनीपेठ, जिल्हापेठ, पाचोरा, अमळनेर व अडावद पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हे केले आहेत. भोकरदन जिल्हा जालना पोलिस स्टेशनच्या अभिलेख्यावर त्याने केलेल्या दोन दुकान फोड्यांची नोंद आहे . त्याच्या अटकेमुळे भोकरदन येथील दोन दुकानफोडीचे गुन्हे निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे त्याला भोकरदन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्याच्या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अकरम शेख, पो.नाईक नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, राहुल पाटील, आदींनी तपासकामी सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here