ट्रकमधील डीझेलची चोरी करणारे अटकेत

जळगाव : उभ्या ट्रकच्या इंधन टाकीतून डीझल चोरी करणा-या दोघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. या गुन्ह्यातील एक आरोपी फरार असून पोलिस पथक त्याच्या मागावर आहे.

पुरुषोत्तम श्रीराम सोळंके हे ट्रक चालक असून त्यांच्या ताब्यातील ट्रकमधे त्यांनी 146 लिटर डीझेल भरले होते. डीझेल भरलेले वाहन त्यांनी एमआयडीसी परिसरातील भारत गॅस कंपनीच्या परिसरात 20 ऑक्टोबरच्या सयंकाळी उभे केले होते. त्यानंतर ते घरी निघून गेले. दुस-या दिवशी 21 ऑक्टोबरच्या सकाळी ते ट्रकजवळ आले असता त्यांना डीझेल टाकीला लावलेले कुलूप तुटलेले दिसून आले. तसेच टाकीतील डीझेल देखील चोरी गेल्याचे दिसू;न आले. वाहनातील डिझेलची तपासणी केली असता 17 हजार 460 रुपये किमतीचे 180 लिटर डिझेल चोरी झाल्याचे त्यांना आढळून आले. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला डीझेल चोरीचा गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्याच्या तपासात वैभव दत्तात्रय पाटील रा. गणपती नगर पिंप्राळा जळगाव व सुमीत धर्मेंद्र अग्रवाल रा. न्यु. ख्वाजा नगर हुडको पिंप्राळा या दोघा तरुणांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. त्यांनी आपला गुन्हा कबुल केला असता त्यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात राहुल उर्फ सुपडू सुरेश गजरे रा. हुडको पिंप्राळा याचा देखील  सहभाग असल्याचे दोघांनी कबुल केले. राहुल उर्फ सुपडू सुरेश गजरे हा शनिपेठ हद्दीतील प्राणघातक हल्ल्याच्या घटनेतील आरोपी असून सध्या तो नंदुरबार कारागृहात आहे. नंदुरबार कारागृहातून त्याचा ताबा घेतला जाणार आहे.

अटकेतील आरोपींनी यापुर्वी देखील जळगाव शहरात डिझेल चोरीचा गुन्हा केला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे  यांच्या निर्देशाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, मुदस्सर काझी, किशोर पाटील,  सचिन पाटील, साईनाथ मुंडे यांनी तपासकामी सहभाग घेतला. तपास अधिकारी मुदस्सर काझी यांनी अटकेतील दोघांना न्या. ए. एस. शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना उद्यापर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. राहुल गजरे याचा ताबा नंदुरबार कारागृहातून घेतला जाणार आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here