लक्ष्मण सकट याच्या जुगार अड्ड्यावर छापा

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : जळगाव शहरातील वाघ नगर बस स्टॉपनजीक असलेल्या एका गाळ्यात सुरु असलेल्या सट्टा पेढीवर छापा टाकण्यात आला. या छाप्यात दिलीप कहू महाजन (40), रा. हरिविठ्ठल नगर मारोती मंदीर जवळ जळगांव, सुनिल मुरलीधर हटांगळे (32), रा राजीव गांधी नगर, जळगांव, राहुल बंडु सुतार (30) रा. आशाबाबा नगर, चामुंडा माता मंदीराजवळ, जळगांव, दत्तु ओंकार राव (65) रा. जिजाऊ नगर, गणपती नगर जवळ, जळगांव, शिवाजी गिरधर घोडेस्वार (74) रा. रामानंद नगर जवळ, यशवंत नगर, जळगांव या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर अड्डा लक्ष्मण सकट याचा असल्याचे तपासात पुढे आले आहे.

या प्रकरणी हे.कॉ. सतीष डोलारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सायंकाळी सात वाजता करण्यात आलेल्या या कारवाईत सट्टा जुगाराची साधने, तिन मोबाईल हॅंडसेट, 7 हजार 200 रुपये रोख असा एकूण 21000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या आदेशाने टाकण्यात आलेल्या या छाप्यात स.पो.नि. संदीप परदेशी, स.पो.नि. शिंदे, हे.कॉ. सतिष डोलारे, पो.कॉ. निकम, अजय सपकाळे, जगदाळे आदींनी सहभाग घेतला.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here