ट्रकचालकाचा मोबाईल हिसकावणारे दोघे अटक

जळगाव : ट्रक चालकाचा मोबाईल जबरीने हिसकावत पळून जाणा-या दोघा तरुणांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. राम मुकेश करोसीया (21) भवानी नगर नशिराबाद जिल्हा जळगाव आणि राजेंद्र सुकलाल भोई (20) निमजाई माता नगर नशिराबाद असे अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत.

रिकाम्या बाटल्यांनी भरलेला ट्रक सोनाजी अशोक मिरग़े हा ट्रक चालक औरंगाबादला घेऊन जात होता. चिंचोली येथून निघाल्यानंतर वाटेत उमाळा घाटात ट्रकचा वेग कमी झाला. त्यावेळी मोटार सायकलवर आलेल्या चौघांनी ट्रक अडवून थांबण्यास भाग पाडले. लुटीच्या हेतूने ट्रकमधे चढलेल्या दोघांना ट्रकचालक सोनाजी मिरगे याच्याकडे रोख रक्कम अथवा मौल्यवान वस्तू मिळाली नाही. त्यामुळे दोघा तरुणांनी ट्रक चालक सोनाजी याचा मोबाईल हिसकावला. मोबाईल हिसकावत एकाच मोटारसायकलवर चौघांनी पळ काढला.

दरम्यान ट्रकचालक सोनाजी मिरगे याने मोटार सायकलवरील लुटारु तरुणांचा ट्रकने उलट दिशेने प्रवास करत पाठलाग केला. मात्र त्यात अपयश आले. मात्र ट्रकचालकाने मोटार सायकलचा क्रमांक टिपून घेतला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेच्या तपासादरम्यान पो.नि. शिकारे यांना समजलेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सचिन मुंडे, इमरान सैय्यद, मुदस्सर काझी, योगेश बारी, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, मुकेश पाटील, किशोर पाटील आदींनी राम मुकेश करोसीया व राजेंद्र भोई या दोघांना नशिराबाद येथून वेगवेग़ळ्या ठिकाणाहून ताब्यात घेत अटक करण्यात आली. राम करोसिया याच्याविरुद्ध यापूर्वी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. दोघांना न्या. ए.एस. शेख यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारपक्षाच्या वतीने अ‍ॅड. प्रिया मेढे यांनी कामकाज पाहिले. इतर आरोपींचा शोध सुरु आहे. अटकेतील दोघा आरोपींकडून अनेक गुन्हे उघडकीस येणार असल्याचे म्हटले जात आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here