एसीबीच्या वतीने जनजागृती सप्ताहाचे आयोजन

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात दरवर्षी एक आठवडा दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने या वर्षी दि. 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021 या कालावधीत अँन्टी करप्शन ब्युरो, जळगांव तर्फे “दक्षता जनजागृती सप्ताहाचे ” आयोजन करण्यात येणार आहे.

त्या अंतर्गत मंगळवार दि. 26 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेऊन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या संदेशाचे वाचन केले जाणार आहे. शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार आणि भ्रष्ट पध्दतीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी दक्षता जनजागृती मोहिम राबवण्यात येत आहे. त्याअनुषंगाने “दक्षता जनजागृती सप्ताह” अंतर्गत अ‍ॅंटी करप्शन ब्युरोची कार्यप्रणाली, भ्रष्टाचार विरोधी कायद्याची माहिती आणि अंमलबजावणी याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्याअंतर्गत नविन बस स्थानक, स्वातंत्र चौक, सेशन कोर्ट चौक, रेल्वे स्टेशन व इतर गर्दीच्या ठिकाणी दक्षता जनजागृतीपर बॅनर लावण्यात येणार आहेत. तसेच नविन बस स्थानक, रेल्वे स्टेशन परिसरात भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत माहिती असलेले स्टिकर्स लावण्यात येणार असुन नागरीकांना हॅन्डबिल्सचे वाटप केले जाणार आहे.

28 ऑक्टोबर 2021 रोजी आकाशवाणी, जळगांव केंद्रावर दक्षता जनजागृती सप्ताह निमीत्ताने जळगांव आकाशवाणी केंद्रावर मुलाखत प्रसारीत होणार आहे. मुलजी जेठा महाविद्यालय, नुतन मराठा महाविद्यालय जळगांव व नाहाटा महाविद्यालय भुसावळ येथील विदयार्थी/विदयार्थीनींना भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. जैन उद्योग समुह, जळगांव यांच्या सहकार्याने जळगांव जिल्ह्यातील ग्रामीण भागात भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत स्टिकर्स व पोस्टर्स लावण्यात येत आहेत. तसेच जळगांव शहरातील प्रमुख चौकांमध्ये पथनाट्याचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. कोणताही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी करत असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन जळगाव अ‍ॅन्टीकरप्शन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here