कोयत्याने वार करणा-या ट्रकचोराविरुद्ध जामनेरला गुन्हा

जळगाव : सिल्लोड येथे गॅरेजवर दुरुस्तीसाठी लावलेला ट्रक चोरट्याने जामनेरला आणल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरटा जामनेरचा रहिवासी असून त्याच्या व ट्रकच्या शोधात आलेल्या मॅकेनिकवर चोरट्याने कोयत्याने हल्ला चढवला. 25 ऑक्टोबरच्या रात्री घडलेल्या या थरारक घटनेप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख शाहीद शेख वाहीद (सिल्लोड)असे जखमी झालेल्या मॅकेनिकचे नाव असून मोईनुद्दीन मुकीमोद्दीन सैय्यद (जामनेर) असे ट्रक चोरट्याचे नाव आहे.

शेख शाहिद शेख वाहिद हे ट्रक मॅकेनिक असून त्यांचे सिल्लोड येथे गॅरेज आहे. शेख शहिद यांच्या गॅरेजवर त्यांच्या मामाचा ट्रक (एमएच- 12, सीएच- 1786) दुरुस्तीसाठी आलेला होता. रविवारच्या रात्री सदर ट्रक मोईनुद्दीन याने जामनेरला पळवून आणला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत मॅकेनिक शेख शाहीद व त्यांचे नातेवाईक जामनेरपर्यंत येवून ठेपले. एका ढाब्यावर जेवण करत असतांना त्यांना ट्रक आपल्या नजरेसमोरुन जात असल्याचे दिसून आले. त्याचवेळी सर्वांनी ट्रकचा पाठलाग सुरु केला.

या घटनेत चोरटा मोईनुद्दीन व मॅकेनिक शेख शाहीद यांच्यात झटापट झाली. या झटापटीत चोरट्याने मॅकेनिकच्या हातावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात मॅकेनिक शेख वाहीद जखमी झाला. त्याच्यावर जामनेर येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी जखमी शेख शाहिद यांच्या फिर्यादीनुसार जामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here