पीएसआय विरुद्ध अमळनेरच्या तरुणीची तक्रार

जळगाव : अमळनेर येथील माहेरवाशीन विवाहीत तरुणीने मुंबई आग्रीपाडा पोलिस स्टेशनला कार्यरत असलेल्या पीएसआय विरुद्ध धुळे – आझादनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. मुकेश शिरसाठ असे सदर पीएसआयचे नाव आहे.

अगोदरच लग्न झालेले असतांना आपल्यासोबत लग्न करुन फसवणूक केली असा अमळनेर येथील तक्रारदार विवाहीत तरुणीचा आरोप आहे. जानेवारी 2021 मधे धुळे येथे तक्रारदार तरुणीचा पीएसआय मुकेश शिरसाठ यांच्यासोबत विवाह झाला. मुकेश शिरसाठ अगोदरच विवाहित असतांना त्यांनी आपल्यासोबत लग्न केले व पहिल्या लग्नाची माहिती लपवली या आरोपाखाली दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे. पिडीत विवाहीता अमळनेर तर मुकेश शिरसाठ शिरपुर येथील रहिवासी आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here