दोनशे रुपयांची लाच मागणी – आरटीओ एजंटविरुद्ध गुन्हा

जळगाव : दुचाकी हस्तांतरणाच्या कामासाठी दोनशे रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी जळगाव आरटीओ कार्यालयातील एजंट प्रशांत उर्फ पप्पू भोळे याच्याविरुद्ध रामानंद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एजंट पप्पू भोळे याची जे.के. मोटार ड्रायव्हिंग स्कुल आहे.

अ‍ॅक्टीव्हा या वाहनाच्या हस्तातरणकामी एजंट प्रशांत भोळे याच्या लाच मागणीप्रकरणी तक्रारदाराने नाशिक एसिबीकडे धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या आधारे एसीबीने सापळा रचला होता. मात्र सापळ्याची कुणकुण लागल्याने भोळे याने लाच घेतली नाही. लाच घेतली नसली तरी लाचेची मागणी व रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे एसीबीच्या तपासणीत निष्पन्न झाले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here