बायो डिझलची चोरटी विक्री उघडकीस

जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बायो डिझेलचा काळाबाजार व चोरटी विक्री उघडकीस आणली आहे. आज भल्या पहाटे भुसावळ – मुक्ताईनगर दरम्यान महामार्गावरील गरिब नवाज ढाब्यानजीक करण्यात आलेल्या या कारवाईने खळबळ माजली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरणगाव नजीक असलेल्या गरिब नवाज या ढाब्यानजीक करण्यात आलेल्या कारवाईत बायो डीझल विक्रीसाठी लागणारे साहित्य, 25 हजार लिटर बायो डीझल (83 रुपये प्रती लिटर प्रमाणे 20 लाख 75 हजार रुपये किंमत), दहा लाख रुपये किमतीचे टॅंकर असा एकुण 31 लाख 95 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मशिनद्वारे ट्रक मध्ये बायो डिझेल भरतांना आरोपी मालक युसूफ खान नुर खान (54) रा.सिध्देश्वर नगर वरणगाव ता.भुसावळ, आरोपी कामगार आफताब अब्दुल कादर राजकोटीया (21) रा. हिना पार्क वरणगाव मुळ रा.हुसेनी चौक 420 टकिया स्टेट कालावड जि.जामनगर, गुजरात, आरोपी टॅकर चालक बेचु मौर्या चंद्रधन मौर्या (41) रा.खरगपुर पोस्ट मेहनगर आजमगड उत्तर प्रदेश आदींना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. अटकेतील तिघा जणांविरुध्द वरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 186/21 अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 कलम-3,7 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. जालिंदर पळे, सहायक फौजदार युनुस शेख, इब्राहिम, हे.कॉ. सुनिल पंडीत दामोदरे, दिपक शांताराम पाटील, पोलिस नाईक रणजित अशोक जाधव, किशोर ममराज राठोड, पो.कॉ. श्रीकृष्ण देशमुख, चालक पोलिस नाईक दर्शन हरी ढाकणे, चालक पोहेकॉ. भारत शांताराम पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here