नंदुरबारकर सराफ दुकानातून दागीन्यांची चोरी

जळगाव : ऐन दिवाळीत चोरट्यांनी जळगावच्या सराफ दुकानातून 2 लाख 40 हजार रुपयांचे दागिने लंपास करत आपली दिवाळी साजरी केली आहे. जळगावच्या ढाके वाडी परिसरात नंदुरबारकर सराफ ज्वेलरी दुकानातून 30 व 31 ऑक्टोबरच्या रात्री आपली हात की सफाई करत आपली करामत दाखवली आहे.

ढाकेवाडी परिसरातील श्रीकृष्ण मंदीरासमोर सराफ परिवार वरच्या मजल्यावर राहतो. खालच्या मजल्यावर त्यांचे सराफी दुकान आहे. प्रसन्न सराफ यांनी नेहमीप्रमाणे 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे सात वाजता दुकान बंद केले. दुस-या दिवशी सकाळी (31 ऑक्टोबर 2021) त्यांना दुकानाच्या शटरच्या बाजुला असलेल्या लाकडी दरवाजाचा कडी कोंडा व कुलूप तुटलेले दिसून आले. काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आल्यावर प्रसन्न सराफ यांनी दुकान उघडून पाहिले असता आतील सामान अस्ताव्यस्त पडलेला होता.

दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत रितसर तक्रार दिली. पोलिस अधिकारी व कर्मचा-यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दुकानातून 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे 10 ग्रॅम वजनाचे सर्व प्रकारचे मणी, 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे 20 ग्रॅम वजनाच्या नाकातील 200 नग फुली, 20 हजार रुपये किमतीचे चांदीच्या तोरड्या, 10 हजार रुपये किमतीचे चांदीचे 300 ग्रॅम वजनाचे ब्रेसलेट 10 नग, 10 हजार रुपये किमतीचे चांदीचे 300 ग्रॅम वजनाचे कमरेचे 15 आकडे, 15 हजार रुपये किमतीचे चांदीचे 400 ग्रॅम वजनाच्या 25 नग चैन, 30 हजार रुपये किमतीच्या चांदीच्या 500 ग्रॅम वजनाच्या गणपतीच्या 10 व लक्ष्मीच्या 10 मुर्ती , 15 हजार रुपये किमतीचे 400 ग्रॅम वजनाचे चांदीचे 30 शिक्के, 20 हजार रुपये किमतीच्वे 500 ग्रॅम वजनाचे चांदीचे 50 तोडे असा एकुण 2 लाख 40 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here