गुन्हेगाराच्या तपासणीकामी गेलेल्या पोलिसाला मारहाण

औरंगाबाद : रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या तपासणीकामी गेलेल्या पोलिसकर्मीला एका आरोपीने मारहाण केल्याची घटना 30 ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली. या घटनेत गुन्हेगाराने दोघा पोलिसांकडील स्कॅन मशिनसह वॉकी टॉकी व स्कॅनिंग मशिन हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटने प्रकरणी भीमनगरमधील अण्णा रावसाहेब बोरगे याच्या विरुद्ध छावणी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अभिलेख्यावरील गुन्हेगारांच्या नियमीत तपासणीकामी छावणी पोलिस स्टेशनचे हवालदार धर्मेंद्र गणेशलाल राठोड व थोरात असे दोघे जण शनिवारी रात्री भिमनगर परिसरात गेले होते. अण्णा बारगे या गुन्हेगाराला आवाज देऊन घराबाहेर तपासणीकामी बोलावण्यात आले. मात्र आवाज दिल्यानंतर देखील तो बाहेर आला नाही.

त्याच्या घराचा दरवाजा वाजवल्याचा त्याला राग आला. त्याने आक्षेपार्ह शब्दात दोघा पोलिसांसोबत वर्तन केले. तसेच त्यांच्याकडील स्कॅन मोबाईलसह इतर साहित्य हिसकावण्याचा प्रयत्न करत जिवे ठार करण्याची धमकी दिली. या घटनेप्रकरणी नियंत्रण कक्षाला कळवण्यात आले. छावणी पोलिस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिस्थीतीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here