गावठी कट्टा बाळगणारा धुळे पोलिसांच्या ताब्यात

धुळे :  शुभम सुनिल पुंड (24) रा.प्लॉट नं. 2 लक्ष्मी वाडी रेल्वे क्रॉसिंग जवळ, शासकीय दुध डेअरी रोड धुळे या तरुणास धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्या कब्जातून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस असा 26 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

धुळे शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. नितीन देशमुख यांना समजलेल्या माहितीच्या आधारे  शुभम यास धुळे शहरातील दसेरा मैदानाजवळ असलेल्या आशिर्वाद कॉम्प्लेक्स परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्ज्जात एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली. पो.नि. नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. विलास भामरे, मुक्तार मन्सुरी, पो.कॉ. प्रविण पाटील, मनिष सोनगिरे, तुषार मोरे, शाकीर शेख व अविनाश कराड आदींनी तपासकामात सहभाग घेतला. पुढील तपास हे.कॉ. व्ही. आर .भामरे करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here