अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या पतीची हत्या

काल्पनिक छायाचित्र

धुळे : अनैतीक संबंधात अडसर ठरणा-या विवाहीतेच्या पतीची तिच्या प्रियकराने हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. धुळे जिल्ह्यातील सोंडले ता. शिरपुर येथील घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. दारुच्या नशेत लोखंडी रॉडने अगोदर मयतास मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच्या पायाला तार बांधून तो विहीरीत टाकून देण्याचा प्रकार करण्यात आला. या प्रकरणी प्रियकराला अटक करण्यात आली असून पत्नीला ताब्यात घेण्यात आले आहे.

निंबा रुपला पाटील व शरद शालिग्राम पाटील हे दोघे सोनगीर येथे शेजारी शेजारी रहात होते. निंबा पाटील याच्या पत्नीसोबत शरदचे अनैतीक संबंध असल्याचे म्हटले जात आहे. दोघांच्या संबंधात महिलेचा पती निंबा त्यांना अडसर वाटत होता. त्यामुळे शरदने निंबाचा काटा काढण्याचे ठरवले.

निंबा यास दारु पिण्याचे व्यसन असल्याचे हेरुन शरदने त्याला दारु पिण्यासाठी मोटारसायकलवर बसवून नेले होते. दारुचा अंमल मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर जुना वाद उकरुन शरदने त्याच्यावर लोखंडी रॉडने वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. निंबाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पायांना तारेने बांधून तो विहीरीत टाकून देण्यात आला. दहा दिवस मृतदेह पाण्यात पडून असल्याने तो कुजला होता. गेल्या 21 ऑक्टोबर पासून निंबा बेपत्ता होता. त्याचा मृतदेह विहीरीत आढळून आल्यानंतर पोलिस तपासात शरद यास ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीनुसार घटनेचा उलगडा झाला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here