लुटारु टोळीच्या मारहाणीत एक ठार

जळगाव : शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणा-या दोघांना जमावाने मुक्ताईनगर व नांदुरा पोलिस स्टेशन हद्दीत मारहाण केल्याची घटना मध्यरात्री घडली. या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला असून हत्येचा गुन्हा शुन्य क्रमांकाने नांदुरा पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला वर्ग केला जाणार आहे.

अनिल आनंदा निकम व प्रल्हाद शिवराम पाटील हे दोघे जण काल मध्यरात्री शेगाव येथे गजानन महाराज मंदीरात जाण्यासाठी रेल्वेने निघाले होते. वाटेत ते नांदुरा येथे उतरले व तेथून शेगावच्या दिशेने जाण्याच्या बेतात होते. त्यावेळी नांदुरा येथे पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्यांना अडवत मारहाण केली. त्यांना वढोदा हलखेडा या मुक्ताईनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत आणून बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रल्हाद शिवराम पाटील हे जबर जखमी झाले. तसेच टोळक्याने त्यांच्याकडील पैसे देखील जबरीने काढून घेतले.

प्रल्हाद शिवराम हे या घटनेत मृत्युमुखी पडले असून नांदुरा पोलिस स्टेशनला अनिल आनंदा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुन्य क्रमांकाने खूनाचा गुन्हा दाखल केला असल्याचे समजते. तसेच शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत मुक्ताईनगरला सदर गुन्हा वर्ग झालेला नव्हता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांना माहिती देत मुक्ताईनगरचे पो.नि. राहुल खताळ व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. सदर गुन्हा मुक्ताईनगर पोलिसात वर्ग केला जाणार आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here