मटका किंगचा पत्रकारावर प्राणघातक हल्ला

नाशिक : सटाणा येथून डांगसौंदाणे गावाच्या दिशेने जाणा-या पत्रकारावर बारा हल्लेखोरांनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी मध्यरात्री सटाणा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत चंद्रात्रे असे नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार घेणा-या जखमी पत्रकाराचे नाव आहे.

पत्रकार हेमंत चंद्रात्रे व व त्यांचे सहकारी बाबा जगताप असे दोघे जण सटाणा येथून डांगसौंदाणे गावाच्या दिशेने जात होते. त्यावेळी चार मोटार सायकलने बारा जण त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आले. हेमंत चद्रात्रे यांच्या उजव्या हातासह मांडीवर जवळपास आठ वेळा कोयत्याने वार करण्यात आले. रस्त्यावर वर्दळ नसल्याने हल्ला केल्यानंतर सर्व मारेकरी पलायन करण्यात यशस्वी झाले.

हल्ला करणा-यामधे डांगसौंदाणे येथील बंटी वाघ असल्याचे म्हटले जात असून त्याचा मटका व्यवसाय असल्याचे देखील समजते. पत्रकाराच्या बातमीमुळे आपला मटका व्यवसाय बंद झाल्याच्या गैरसमजातून हा हल्ला झाल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी सटाणा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here