उंदीर मारण्याच्या औषधाने प्रियकराला ठार करण्याचा प्रयत्न

जालना : प्रियकराकडून वेळोवेळी मिळणारे पैसे बंद झाल्याने अंगणवाडी सेविकेने प्रियकराला विषप्रयोगाच्या माध्यमातून ठार मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश नाथाराम घुगे (35) लोधी मोहल्ला जालना असे वैद्यकीय उपचार घेणा-या प्रियकराचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार कदीम जालना पोलिस स्टेशनला प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागणीप्रमाणे वेळोवेळी देण्यात येणारी धनराशी बंद केल्यामुळे प्रेयसीने उंदीर मारण्याचे औषध पाण्यातून दिल्याचे निदर्शनास आल्याचे प्रियकराने फिर्यादीत म्हटले आहे. रमेश नाथाराम घुगे याचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. जालना शहरातील एका अंगणवाडी सेविकेसोबत गेल्या दिड वर्षापासून त्याचे प्रेमसंबंध होते. प्रत्येकवेळी गरजेनुसार प्रेयसीला तो आर्थिक मदत करत होता. मात्र कालांतराने आर्थिक वादातून त्यांच्यातील संबंध बिघडले. त्यातून विषप्रयोगाचा प्रकार झाला असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास कदीम जालना पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक इंगळे करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here