तंबाखू, पानमसाला, सिगारेटच्या अवैध साठ्यावर जळगावात कारवाई

जळगाव : जळगाव शहरातील सिंधी कॉलनी भागात प्रतिबंधीत पान मसाला, तंबाखू व सिगारेटच्या अवैध साठ्यावर कारवाई करण्यात आली. सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या अख्त्यारीत 67 हजार 595 रुपये किमतीचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. 9 नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईने प्रतिबंधीत तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांमधे खळबळ माजली आहे. संतोष हुकुमतपाल राजपाल (घर नं. 42, संत राजाराम नगर, सिंधी कॉलनी जळगाव) यांच्या राहत्या घरात हा साठा आढळून आला. कारवाई दरम्यान घरमालक संतोष राजपाल मात्र हजर नव्हते. त्यांचा पुतण्या कैलाश खेमचंद राजपाल याच्या हजेरीत सदर कारवाई झाली.

पोलिस नाईक दिपक चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संतोष राजपाल याच्याविरुद्ध भा.द.वि. 188, 272, 273, 328 व अन्न् सुरक्षा मानके कायदा 2006 चे कलम 26(2) (1), 26(2) (4), 27(3) (डी), 28(3) (ई ), 58, 59 प्रमाणे कायदेशीर करण्यात आली. पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्यासह सहायक फौजदार अतुल वंजारी, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, पो.ना. गणेश शिरसाळे, पो.ना. मिलींद सोनवणे, पो.ना. इमरान सैय्यद, पो.ना. सुधीर सापळे, पो.ना. कृष्णा पाटील, पो.ना. श्रीकांत बदर, पो.का. गोविंदा पाटील, पो. कॉ. किशोर पाटील, पो.कॉ. सचिन पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. त्यांना जळगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक सर्जेराव क्षीरसागर, पो.कॉ. सागर सुर्ययशी, पो.कॉ. अनिल सुखराम खंदाळे, पो.कॉ. संदीप सोनवणे (नेमणूक आर.सी.पी. प्लाटुन) पोलीस मुख्यालय आदींनी सहकार्य केले. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक रविंद्र गिरासे करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here