गुन्हेगाराचे दोन्ही डोळे फोडून हत्या करणारा अटक

औरंगाबाद : पोलिसांच्या अभिलेख्यावरील अट्टल गुन्हेगाराची दोन्ही डोळे फोडून चाकूने हत्या केल्याची घटना बुधवारच्या सकाळी औरंगाबाद – जळगाव रस्त्यावरील वोक्हार्ट चौकानजीक घडली. अबुबकर चाऊस असे मयत गुन्हेगाराचे नाव असून त्याच्या नावे तडीपारी, एमपीडीए कायद्यानुसार विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सय्यद समीर उर्फ स्टायलो सय्यद शौकत रा. अल्तमश कॉलनी औरंगाबाद यास अटक केली आहे.

जिन्सी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गोकुळ ठाकूर यांनी आरोपी सय्यद समीरला ताब्यात घेतले. त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. त्याला एमआयडीसी सिडको पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक संजय मांटे करत आहेत.

मयत अबुबकर आणि आरोपी सय्यद समीर हे दोघे जण आंबेडकरनगर परिसरात सोबत बसून मद्यप्राशन करत होते. त्यावेळी समीरचा मोबाइल अबुबकरच्या ताब्यात होता. दरम्यान समीरच्या आईचे सतत फोन येत असतांना देखील अबुबकर त्याला फोन देत नव्हता. आपला फोन देत नसल्याचा राग व जुन्या वादातून अबुबकरची डोळे फोडून हत्या केल्याची कबुली समीरने केली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here