वाहनांमधे गॅस भरुन देणा-या सिलेंडर साठ्यावर छापा

जळगाव : वाहनांमधे अवैध रितीने घरगुती गॅस भरुन विक्री करणा-या दोघांना गॅस सिलेंडरच्या साठ्यासह ताब्यात घेण्यात आले आहे. सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिराजखान रज्जाक खान उर्फ शेराखान (30) रा. मास्टर कॉलनी जळगाव व जहांगीर रफीक पटेल (44) रा. सदाशिवनगर शेरा चौक जळगाव या दोघांविरुद्ध अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 चे कलम 347 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी 68600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मास्टर कॉलनी परिसरात काही इसम घरगुती सिलेंडरमधील गॅस वाहनांमध्ये बेकायदा भरुन देत असल्याची माहीती मिळाल्याने सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी तयार केलेल्या पथकाने सदर कारवाई केली. पो.नि. प्रताप शिकारे, स.पो.नि. प्रमोद कठोरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलिस नाईक मिलींद सोनवणे, गणेश शिरसाळे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. त्यांना जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे कर्मचारी पोलिस नाईक सलीम तडवी, पोना रविंद्र मोतीराया, पोना महेश महाले, पोकॉ समाधान पाटील आदींनी मदत केली.

या कारवाईत रोख रक्कम 1920 तसेच 8480 रुपये किमतीचे भारत गॅस कंपनीचे भरलेले चार घरगुती सिलेंडर, 28800 रुपये किमतीचे भारत गॅस कंपनीचे 24 रिकामे सिलेंडर, 1200 रुपये किमतीचे इन्डेन कंपनीचे एक रिकामे सिलेंडर, 1200 रुपये किमतीचे एचपी कंपनीचे एक रिकामे सिलेंडर, 15000 रुपये किमतीचा एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा व 12000 रुपये किमतीचा गॅस भरण्याचा पंप(मशिन) असा एकुण 68600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सिराजखान रज्जाक खान उर्फ शेराखान व जहांगीर रफीक पटेल या दोघांना अटक करण्यात आली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here