अजिंठा रेस्ट हाऊस प्रकरणात सत्यता नाही : डॉ. प्रविण मुंडे

जळगाव : जळगाव अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे तरुणीवर कथित अत्याचार प्रकरणात पोलिसांनी शोध घेतला. त्या प्रकरणात तपासाअंती सत्यता आढळून आलेली नाही. पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी तसे म्हटले आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल राज्य महिला आयोगाकडे सादर करण्यात आला असल्याचे देखील पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी म्हटले आहे.

तथापी कुणी तक्रारदार ठोस मुद्द्याच्या/पुराव्याचा आधारे पुढे आल्यास त्याबाबत भविष्यात निश्चीतच कारवाई केली जाणार असल्याचे देखील पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी म्हटले आहे. अद्याप तरी या प्रकरणी सत्यता नसल्याचे तपासाअंती आढळून आल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी म्हटले आहे. जळगाव येथील अजिंठा या शासकीय विश्रामगृहात एका तरुणीवर कुणा राजकीय नेत्याने अत्याचार केल्याबाबतचे वृत्त वा-यासारखे पसरले होते. जनतेच्या मनात याबाबतचा संभ्रम अद्याप कमी अधिक प्रमाणात कायम आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here