रिक्षा चालकाची हत्या – एक ताब्यात

अकोला : अकोला रेल्वे स्टेशन परिसरात आरएस हॉटेलनजीक एका वृद्ध रिक्षा चालकाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. गुरुवार 11 नोव्हेंबरच्या रात्री उघडकीस आलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

आसिफ पठाण असे मयत रिक्षा चालकाचे नाव असून त्याची हत्या करणा-याचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळावर डिवायएसपी रितू खोखर, एलसीबीचे अधिकारी, फॉरेन्सिक लॅबचे पथक तसेच रामदास पेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर शेळके आदींनी धाव घेत पुढील तपास व कारवाई सुरु केली. याप्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून एका संशयीतास अटक केली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here