घरगुती गॅसच्या काळ्या बाजाराविरुद्ध जळगावात मोहीम

जळगाव : घरगुती गॅस काळया बाजारात विक्री करणारी टोळी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. वेगवेगळ्या पाच पथकांच्या माध्यमातून आज जळगाव शहरात छापेमारी व कारवाई करण्यात आली. विविध पाच ठिकाणी पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या अख्त्यारीत करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण 12 लाख 56 हजार 660 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मुद्देमालात घरगुती गॅस हंडया, रिक्षा, व गॅस भरण्यासाठी लागणारी साधने व साहित्य आदींचा समावेश आहे. या कारवाईत एकुण बारा जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे घरगुती गॅसचा काळा बाजार करणा-यांच्या गोटात खळबळ माजली आहे.

जळगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीत शाहुनगर कॉम्पलेक्सच्या भिंतीलगत टाकण्यात आलेल्या छाप्यात 43 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात घरगुती गॅस रिक्षात भरण्यासाठी लागणा-या गॅस हंडया, साधने व साहित्य जप्त करण्यात आले. तसेच मकसुदअली सैय्यद (66) रा.भिस्तीवाडा पडती शाळेच्या मागे शाहुनगर, जळगाव यास अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सहायक फौजदार संजय हरिदास पवार, पोहेकॉ विकास रामदास वाघ, पोहेकॉ साहेबराव अभिमन चौधरी, पोना किरण यशवंत चौधरी आदींनी सहभाग घेतला.

शनीपेठ पोलिस स्टेशन हद्दीत 83 हजार 420 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात जप्त मुद्देमालासह शेख नदीम शेख रसुल (40) काट्या फाईल यास अटक करण्यात आली. या कारवाईत सहायक फौजदार अनिल राजाराम इंगळे, पोहेकॉ जितेंद्र राजाराम पाटील, पोना नितीन प्रकाश बाविस्कर, पोना राहुल मधुकर बैसाणे, पोकॉ पंकज रामचंद्र शिंदे आदींनी सहभाग घेतला.

जळगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीत करण्यात आलेल्या दुस-या कारवाईत ट्राफीक गार्डन जवळ छापा टाकण्यात आला. या कारवाईत 1 लाख 78 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालासह जाकिर शेख चाँद पिंजारी (45) रा.काटया फाईल शनीपेठ (मालक) व राजेश अर्जुन गोपाळ (28) रा.समतानगर,जळगाव (रिक्षा चालक) यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोहेकॉ. कमलाकर भालचंद्र बागुल, पोहेकॉ. सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ. अनिल गणपतराव देशमुख, पोना किशोर ममराज राठोड आदींनी सहभाग घेतला.

शनीपेठ पोलिस स्टेशन हद्दीत जैनाबाद भागातील वाल्मिक मंदीराजवळ दुस-या कारवाईत 2 लाख 10 हजार 40 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईत कैलास विलास सोनवणे (45)रा.वाल्मिक नगर,जळगाव, (मालक) व सुरज नारायण सोनवणे (30) रा.गेंदालाल मिल,जळगाव (रिक्षा चालक) यांना अटक करण्यात आली. या कारवाईत सफौ. युनुस शेख ईस्राहिम, पोहेकॉ लक्ष्मण अरुण पाटील, पोना रणजित अशोक जाधव, पोकॉ. ईश्वर पंडीत पाटील, पोकॉ. हरिश कनिराम परदेशी, पोकॉ किशोर दयाराम मोरे आदींनी सहभाग घेतला.

शनीपेठ हद्दीतील जैनाबाद भागातील कारवाईत 6 लाख 41 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईत राजु बोरसे (25) रा.वाल्मीक नगर, लेंडी नाल्या जवळ जळगाव, (मालक), संदिप अरुण चौधरी (29), रा.पिंप्राळा गणपती नगर जळगाव, किरण कोळी (25), रा.समता नगर धामणगाव वाडा, जळगाव, आरिफ अब्दुशुभम ल रहेमान (46) रा.फातेमा नगर एमआयडीसी जळगव, मोहम्मद सलमान गुलाम शाहीद बागवान (35) आदींना अटक करण्यात आली. या कारवाईत पोहेकॉ महेश आत्माराम महाजन, पोना प्रितमकुमार पाटील, पोना श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, पोना योगेश नाना वराडे आदींनी सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here