वेशांतर करत पैठण पोलिसांची कामगिरी

पैठण : पैठण एमआयडीसी पोलिस स्टेशनला हवा असलेला विविध गुन्ह्यातील फरार आरोपीस वेशांतर करुन पकडण्यात यश आले आहे. अमजद ऊर्फ डॉन अब्दुल शेख (रा. पिंपळवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

अटकेतील अमजद विरुद्ध दरोडे, रात्रीच्या घरफोड्या, एटीएम तळापासून कापून नेणे, चो-या व हद्दपारीचे उल्लंघन अशा विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकलीसह त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षापासून अमजद फरार होता. दरम्यानच्या काळात साथीदारांच्या मदतीने त्याचे चौर्यकर्म सुरुच होते. त्याच्या अटकेच्या कारवाईत स.पो.नि. भागवत नागरगोजे, कर्मचारी राजेश चव्हाण, गणेश खंडागळे आदींनी सहभाग घेतला. य सर्वांनी विविध प्रकारचे वेशांतर करून आरोपीस अटक केली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here