वृद्धाची रोकड हिसकावत दुचाकीस्वाराचे पलायन

जळगाव : पायी जाणा-या वृद्ध दुकानदाराच्या खिशातील रक्कम सुटे पैसे मागण्याच्या बहाण्याने हिसकावत पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. 11 नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटने प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर विठ्ठल लाडवंजारी असे तक्रारदाराचे नाव असून त्यांचे मेहरुण परिसरातील राम मंदीराजवळ हार्डवेअरचे दुकान आहे.

11 नोव्हेंबर रोजी दुचाकीचा स्विच दुरुस्तीसाठी नजीकच्या महादेव मंदीराजवळ असलेल्या गॅरेजवर गेले होते. तेथून नविन स्विच विकत घेण्यासाठी ते पायी पायी स्पेअर पार्ट्सच्या दुकानाकडे जात होते. दरम्यान रस्त्यात त्यांच्याजवळ एक मोटार सायकलस्वार आला. त्याने भास्कर लाडवंजारी यांना त्याच्या दुचाकीवर बसण्यास सांगितले. वाटेत त्या अनोळखी दुचाकीस्वाराने त्याची दुचाकी उभी केली. तो लाडवंजारी यांना म्हणाला की मला माझ्या मजुरांना पैसे द्यायचे आहे तरी तुम्ही माझ्यासोबत चला. मात्र भास्कर लाडवंजारी यांनी त्याला नकार देत म्हटले की मी पायी निघून जातो.

त्यावेळी त्या दुचाकीस्वाराने त्यांना दोन हजार रुपयांचे सुटे मागितले. त्याला सुटे देण्यासाठी भास्कर लाडवंजारी यांनी खिशातून शंभर रुपयांचे बंडल बाहेर काढले. त्याचवेळी संधी साधण्यास टपून बसलेल्या त्या अनोळखी दुचाकीस्वाराने साडे नऊ हजार रुपयांचे लाडवंजारी यांच्या ताब्यातील बंडल हिसकावत दुचाकीने तेथून पलायन केले. भास्कर लाडवंजारी यांनी लागलीच आरडाओरड सुरु केली. मात्र त्याठिकाणी कुणीच नसल्यामुळे त्यांच्या मदतीला कुणीही आले नाही. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here