मध्य प्रदेशातील त्या पोलिसाला पोलिस कोठडी

धुळे : पिस्टल विक्रीत सहभाग घेणा-या मध्यप्रदेशातील पोलिसाला मंगळवार (16 नोव्हेंबर) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथे पिस्टल विक्रीसाठी दोघे जण आले होते. त्यातील लवकुश डगोर हा मध्यप्रदेशातील पोलिस असून तो सेंधवा पोलिस स्टेशनला गेल्या तिन वर्षापासून कार्यरत आहे.

लवकुश नथुसिंग डगोर (28) आणि आकाश सुरजमल राठोड (22) दोघे रा. सेंधवा जिल्हा बडवाणी मध्यप्रदेश या दोघांना पिस्टल विक्रीसाठी आले असता हाडाखेड परिसरात धुळे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दोघांना न्यायालयात उभे केले असता मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here