नाशिकला पोलिस कर्मचा-याची आत्महत्या

नाशिक : नाशिक ग्रामीण पोलिस मुख्यालयात कार्यरत पोलिस कर्मचा-याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याने परिसरात खळबळ माजली आहे. अक्षय आंधळे  (26) मुळ रा. ठाणगाव ता. सिन्नर असे आत्महत्या करणा-या पोलिस कर्मचा-याचे नाव आहे. त्याने आत्महत्या का केली याचे नेमके कारण समजू शकले नाही.

या घटनेप्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. अक्षय आंधळे हा सन 2018 च्या बॅचचा कर्मचारी होता. आडगाव पोलिस मुख्यालयात त्याची नेमणूक होती. या घटनेने पोलिस दलात खळबळ माजली आहे.

————

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here