ठेवीदारांतर्फे होणार आमदारांच्या कार्यालयासमोर धरणे

गोंदीया (अनमोल पटले) : जागृती पतसंस्थेच्या संचालक मंडळासह शाखा व्यवस्थापकांनी केलेल्या कथित भ्रष्टाचाराची दखल घेतली नाही म्हणून आ. विजय रहागंडाले यांच्या कार्यालयासमोर भ्रष्टाचार संघर्ष समिती ठेवीदारांच्या वतीने 25 नोव्हेंबर रोजी एक दिवसीय आंदोलन केले जाणार आहे.

जागृती सहकारी पत संस्थेच्या विरोधातील तक्रारीमुळे जिल्हा उपनिबंधक सहकारी पतसंस्था गोंदिया यांनी चौकशी पुर्ण केली. सन 2015 ते 2019 या आर्थिक वर्षाच्या कालावधीतील फेर लेखापरिक्षणाचे आदेश देखील देण्यात आले. लेखापरीक्षक सहकारी संस्था गोंदिया वर्ग-1 यांच्या फेरलेखापरीक्षणात 3 कोटी 30 लाख 71 हजार रुपयांची अफरातफर तसेच 15 कोटी 32 लाख 44 हजार 91 रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचे लेखापरीक्षण अहवालात आढळून आले.

25 नोव्हेंबर रोजीच्या धरणे आंदोलनात कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडल्यास संबंधीत विभागाची व प्रशासनाची जबाबदारी राहणार असल्याचे जागृती भ्रष्टाचार संघर्ष समिती ठेवीदार ( मुंडीकोटा, तिरोडा ) चे अध्यक्ष राजेशकुमार तायवाडे ( पत्रकार ), उपाध्यक्ष अशोक पेलागडे, सचिव रामप्रसाद तिवडे, रितेशकुमार गहेरवार, भास्कर गायकवाड, सौ. प्रतिभा गायकवाड, तुलाराम वैद्य, गणेश शिंगनगुडे, सौ. रजनी पेलागडे. सौ. रेखा शिंगनगुडे, आरिफ पठान, दिलीप देशमुख यांनी म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, सहकार मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, आ. विजय रहांगडाले, उप विभागीय पोलिस अधिकारी तिरोडा, तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here