पोलिसावर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हा

अहमदनगर : फरार आरोपीला अटक करण्याकामी गेलेल्या पोलिस कर्मचा-यावर सात जणांकडून प्राणघातक हल्ला झाल्याची घटना नगर तालुक्यात करगाव चौकात घडल्याने खळबळ माजली आहे. भरत बाजीराव धुमाळ असे जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी धुमाळ खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेत आहेत.

रमेश भोसले या फरार आरोपीस अटक करण्याकामी पोलिस कर्मी भरत धुमाळ गेले होते.त्यावेळी सात जणांनी त्यांच्यावर लाकडी दांडके, दगड यांचा वापर करत तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. भरत धुमाळ हे नगर तालुका पोलिस स्टेशनला कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हल्लेखोर रमेश भोसले, तुषार भोसले, आत्मशा भोसले, सावत्या भोसले, अविनाश भोसले, शेरीना भोसले व एक अनोळखी अशा सर्व जणांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उप निरीक्षक चव्हाण पुढील तपास करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here