शेख शरीफ यांना “उत्कृष्ठ पत्रकारिता” पुरस्कार

जळगाव : “ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोशियन महाराष्ट्र” या संस्थेतर्फे राबवण्यात आलेल्या राज्यव्यापी शैक्षणिक जागरुकता अभियानात रावेर येथील पत्रकार शेख शरीफ यांचा सहभाग होता. या अभियानातील त्यांच्या कार्याची दखल घेत असोशियनतर्फे त्यांना हैदराबाद येथील कार्यक्रमात उत्कृष्ट पत्रकारिता या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी असोसिएशनचे अखिल भारतीय अध्यक्ष शेख अब्दुल रहीम, महाराष्ट्र राज्याध्यक्ष सय्यद शरीफ, राज्य सचिव शेख मुहम्मद अतिक, सह केंद्रीय सचिव अस्लम फेरोज, माजी राज्याध्यक्ष अब्दुल जलील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राज्य सल्लागार समितीचे स्थानिक पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष, सचिव, सदस्य देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यामुळे पत्रकार शेख शरीफ यांचे रावेर तालुक्यातील पत्रकार बांधवा व सर्व मित्रपरिवार आणि त्यांच्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून कौतुक देखील करण्यात येत आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here