डान्सर सपना चौधरीच्या शिरावर अटकेची तलवार

हरियाणा येथील सुप्रसिद्ध नृत्यांगना सपना चौधरी विरुद्ध लखनौ न्यायालयाने अटक वारंट काढले असून तिच्या अटकेची शक्यता बळावली आहे. डान्स कार्यक्रमाला गैरहजर राहण्यासह तिकिटाचे पैसे परत न केल्याचा तिच्यावर आरोप आहे. सपना चौधरी सह कार्यक्रम आयोजित करणारे जुनैद अहमद, नवीन शर्मा, किवद अली, अमित पांडे, रत्नाकर उपाध्याय यांच्या विरुद्ध 14 ऑक्टोबर 2018 रोजी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
13 ऑक्टोबर 2018 रोजी लखनौ येथे सपना चौधरीच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी प्रत्येकी तीनशे रुपयांचे तिकीट ठेवण्यात आले होते. सपना चौधरीच्या नृत्याचा दिलखेचक अदा बघण्यासाठी प्रेक्षकांची खच्चून गर्दी जमली होती. मात्र कार्यक्रमाची वेळ संपून गेली तरी सपना चौधरी आली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता.कार्यक्रम रद्द झाला तरी प्रेक्षकांना त्यांच्या तिकिटाचे पैसे परत करण्यात आले नाही. या प्रकरणी 4 सप्टेंबर 2021 रोजी सपनाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. आता 22 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असून न्यायालयाने तिच्याविरुद्ध अटक वारंट जारी केला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here