जळगाव शहर वाहतुक शाखेतर्फे रिक्षाचालकांवर कारवाई तीव्र

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जळगाव शहरातील रिक्षा चालकांवर इलेक्ट्रॉनिक मिटरबाबत कारवाई सुरु आहे. याशिवाय जळगाव शहर वाहतूक शाखेची विविध कलमानुसार देखील कारवाईचा धडाका सुरुच आहे.

विना युनिफॉर्म रिक्षा चालवणे या प्रमुख कारवाईसह इतर विविध कलमानुसार शहर वाहतूक पोलिस रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. आज 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सात वाजेपर्यंत रिक्षाचालकांवर 48 केसेस करण्यात आल्या. या कारवाईच्या माध्यमातून 96 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

दंडात्मक कारवाई कितीही झाली तरी देखील रिक्षा चालकांमध्ये शिस्त निर्माण होत नाही हे देखील तेवढेच सत्य आहे. भर रस्त्यात वाहतुकीकडे दुर्लक्ष करत ताब्यातील रिक्षा उभी करणे ही बहुसंख्य रिक्षा चालकांची सवय आहे. या कृतीमुळे अपघात व पर्यायाने वाद होत असतात. या वादात चुकी रिक्षा चालकाची असली तरी ते आपला वरचढपणा दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. पोलीस अधीक्षक कार्यालयात जाणा-या पहिल्या प्रवेश द्वाराच्या कडेला व वाहतूक शाखा कार्यालयाच्या समोरच प्रवासी मिळवण्यासाठी रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभ्या असतात. अशा वेळी मागून येणाऱ्या वाहन धारकांची वेगावर नियंत्रण मिळवण्याकामी कसोटी लागत असते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here