मोबाईलसह रोकड हिसकावत पलायन करणारे दोघे अटक

जळगाव : जळगाव बस स्थानकालगत भजे गल्लीतून पायी जाणाऱ्या व्यक्तीच्या खिशात हात टाकून मोबाईल व रोख रक्कम हिसकावत पळून जाणाऱ्या दोघा चोरटयांना जिल्हा पेठ पोलिसांनी अटक केली आहे. लोकेश दगडू चौधरी (26) रा कालंकामाता नगर जळगाव व सागर दीपक सोनवणे (20) रा मेहरुण, अशोक किराणाजवळ जळगाव अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

17 नोव्हेंबरच्या रात्री पावणे नऊ वाजता विक्की बाबासाहेब गायकवाड हे भजेगल्लीतून मार्गक्रमण करत होते. त्यावेळी दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. त्यांनी गायकवाड यांच्या शर्टाच्या खिशातून विवो कंपनीचा तीस हजार रुपये किमतीचा मोबाईल व साडे चार हजार रुपये जबरीने काढून घेत पलायन केले. या प्रकाराने गांगरून गेलेल्या विक्की गायकवाड यांनी आरडाओरड करुनही कुणी त्यांच्या मदतीला आले नाही.
या प्रकरणी आज त्यांनी जिल्हा पेठ पोलिसात तक्रार दाखल केली.या घटनेच्या तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे लोकेश दगडू चौधरी व सागर दीपक सोनवणे या दोघांना ताब्यात घेत चौकशी करण्यात असली. त्यांनी आपला गुन्हा कबुल करत जबरीने घेतलेल्या रकमेपैकी दोन हजार रुपये काढून दिले आहेत.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि किशोर पवार,पो.ना. सलीम तडवी,पो कॉ समाधान पाटील,पो कॉ योगेश साबळे करत आहेत.गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासात आरोपीतांचा शोध घेत पोलिस पथकाने गुन्हा उघडकीस आणला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here