मेहरुण तलावात आढळला तरुणाचा मृतदेह

जळगाव : कंपनीत कामावर जातो असे घरी सांगून घराबाहेर पडलेल्या तरुणाचा थेट मृतदेह आज मेहरुण तलावात आढळून आला आहे. महेंद्र हिम्मत पाटील (33) सुप्रीम कॉलनी जळगाव असे मृत तरुणाचे नाव आहे.

महेंद्र पाटील हा सुप्रीम कंपनीत कामाला होता. 17 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तो कामाच्या ठिकाणी जातो असे सांगत घराबाहेर पडला होता. बराच वेळ झाला तरी तो घरी परत आला नाही. त्यामुळे त्याची आई सुनंदाबाई हिम्मत पाटील यांनी एमआयडीसी पोलिसात तो बेपत्ता झाल्याबाबत मिसिंग दाखल केली. त्यानंतर आज त्याची मोटार सायकल मेहरुण तलावा नजीक आढळून आली.

पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय धनगर व महेंद्रसिंग पाटील आदींनी तलाव परिसरात त्याचा शोध घेतला. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह तलावाच्या पाण्यात आढळून आला. सदर माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन मुंडे व मुकेश पाटील यांनी पोहणा-या तरुणांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. कायदेशीर सोपास्कर पूर्ण केल्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी कामी रवाना करण्यात आला. महेंद्र पाटील याने आत्महत्या केल्याचे म्हटले जात असून त्याबाबत कारण अद्याप समजू शकले नाही.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here