चोरटयांकडून हस्तगत मंगळसुत्र तक्रारदार महिलांना जाहीरपणे परत

जळगाव : रस्त्यावर एकट्या महिलांना हेरुन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावत पलायन करणा-या चोरट्यांकडून तपासात निष्पन्न आणि हस्तगत केलेले मंगळसुत्र आज तक्रारदारांना जळगाव पोलीस अधिक्षकांच्या हस्ते जाहीरपणे परत करण्यात आले. जळगाव जिल्हा पेठ पोलिस स्टेशनच्या आवारात हा जाहीर कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या प्रसंगी 8 पैकी 5 तक्रारदार हजर होते.

यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्यासह अतिरिक्त पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंता तसेच पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सपोनि वाघमारे असे सर्व अधिकारी उपस्थित होते. याशिवाय महेंद्र बागुल, संजय दोरकर, सलीम तडवी, विकास पहुरकर, योगेश साबळे, समाधान पाटील असा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

प्रतिभा काटदरे (प्रेम नगर जळगाव), प्रमिला सोमाणी (चैतन्य नगर जळगाव), सुनीता पाटील (श्रीनिवास कॉलनी जळगाव), सुनीता कुलकर्णी (गुरुकुल कॉलनी जळगाव) आदींना त्यांचे चोरटयांनी हिसकावलेले मंगळसुत्र पोलिस अधीक्षकांच्या हस्ते परत देण्यात आले. मंगळसुत्र हिसकावणारे आरोपी सध्या कारागृहात आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here