भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणावर चाकूने वार

जळगाव : शेजारी राहणाऱ्या दोघा भावांचे आपसातील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर एका भावाने चाकूहल्ला केल्याची घटना तालुक्यातील कुसुम्बा या गावी घडली. आकाश अरुण सोनार असे चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून तो रुग्णालयात उपचार घेत आहे. कमलेश जैन असे चाकू हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

चुलत भावाच्या घरभरणीच्या कार्यक्रमाला जायचे अथवा नाही जायचे या कारणावरुन कमलेश व पंकज जैन या दोघा भावात वाद सुरु होता.हा वाद शिवीगाळ व हाणामारीपर्यंत येऊन ठेपला होता. या भांडणाचा आवाज परिसरात येत असल्यामुळे जवळच राहणारे आकाश सोनार व पप्पू सोनार हे दोघे तेथे धावत आले. पप्पूने कमलेशला व आकाशने पंकज यास बाजूला ओढले.

आमच्या वादात तू मध्यस्ती करण्यास का आला असे म्हणत कमलेशने खिशातील चाकू बाहेर काढत आकाशच्या डाव्या बरगडीखाली वार केला. त्यात आकाश जखमी झाला.

जखमी आकाश यास पंकज जैन याने मोटार सायकलवर बसवून सामान्य रुग्णालयात आणून उपचारार्थ दाखल केले. जखमी आकाश यांच्या जवाबानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला कमलेश जैन रा. कुसुम्बा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here