सहायक फौजदार पुत्राची चोघांकडून हत्या

crimeduniya
[email protected]

नाशिक : सराईत गुन्हेगार असलेल्या पोलीस पुत्राची नाशिकच्या आडगाव म्हसरुळ परिसरात चौघा मित्रांनी रात्रीच्या वेळी हत्या केल्याने खळबळ माजली आहे. प्रवीण गणपत काकड असे हत्या झालेल्या पोलीस पुत्राचे नाव असून त्याचे वडील गणपत काकड हे नाशिक रोड पोलिस स्टेशनला सहायक फौजदार पदी कार्यरत आहेत.

हॉटेलवर पार्टीसाठी बोलावून मित्रांनी त्याची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यातील एकाने त्याच्या डोक्यात दगड घालून चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न केला. प्रवीण हा सराईत गुन्हेगार असून एमपीडीए गुन्ह्याअंतर्गत तो कारागृहात होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने म्हसरुळ स्मशानभूमी जवळ दोघा पोलीसकर्मींना मारहाण केली होती.

या घटनेप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पुन्हा कारागृहात गेला होता. कारागृहातून दहा दिवसांपूर्वी तो पुन्हा बाहेर आला होता. या कालावधीत त्याचे पंचवटीतील काही मित्रांसोबत वाद झाले होते. पार्टीच्या बहाण्याने त्याला बोलावले होते. या पार्टीत वाद उफाळून आल्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारतकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here