बायो डिझलची विक्री करणारा अटक

जळगाव : यावल – भुसावळ दरम्यान महाराष्ट्र गुजरात ढाब्यासमोर बायो डीझलची अवैध विक्री करणा-यास मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. शेरखान जुबेर खान (रा.काजीपुरा यावल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यास मुद्देमालासह यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बायो डीझल विक्रीसाठी वापरण्यात येणारे बोलेरो वाहन आणि बायो डीझल असा एकुण 3 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार युनुस शेख इब्राहिम, पोहेकॉ महेश महाजन, पोना किरण मोहन धनगर, पोना प्रमोद अरुण लाडवंजारी यांनी कारवाईत सहभाग घेतला. त्यांना यावल पोलिस स्टेशनचे पो.नि.सुधीर पाटील यांचे सहकारी पोउनि. विनोद खांडबहाले, सहायक फौजदार मुजफ्फर खान, पोकॉ राहुल चौधरी, पोकॉ सुशिल घुगे, पोकॉ राजेश वाडे यांचे सहकार्य लाभले.

बोलेरो पिक अप वाहन क्र.एमएच 48 टी 1783 तसेच 90 हजार रुपये किमतीचे 1000 लिटर बायो डिझल जप्त करण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध यावल पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here