आरशामागे लपल्या होत्या अप्सरा ———-पोलिसांनी शोधला त्यांचा आसरा

अंधेरी येथे असलेल्या दीपा डान्स बारवर मुंबई पोलिसांच्या समाजसेवा पथकाने मंगळवारी रात्री छापा घातला होता. या कारवाईत बार व्यवस्थापकासह रोखपाल व तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. स्थानिक पोलिसांशिवाय एनजीओच्या तक्रारीनुसार केलेल्या कारवाईप्रकरणी अंधेरी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

या बारमधील मेकअप रुमध्ये एक भला मोठा आरसा पोलिसांना संशयास्पद वाटला. या आरशाच्या मागे पाहणी केली असता तेथे एक गुप्त तळघर आढळून आले. या तळघरात 17 बारबाला पोलिस पथकाला आढळून आल्या. केवळ चार बारबाला ठेवण्याची परवानगी असतांना चाळीस नर्तक मुली या ठिकाणी कार्यरत होत्या. नियमाविरुद्ध हा बार रात्रभर सुरु रहात असतांना अंधेरी पोलिसांकडून कारवाई होत नव्हती.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here