आ. मंगेश चव्हाण यांनी मंत्रालय आवारात भरला दंड

विना मास्क वावरत मंत्रालयातून बाहेर पडत असतांना चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. दोनशे रुपये दंडाची आकारणी आ. मंगेश चव्हाण यांच्यावर कर्तव्यावरील पोलिसांनी केली. याचवेळी फोटो काढणा-या छायाचित्रकारास त्यांनी ‘”ए राजा फोटो का काढतो आहे” असा प्रश्न विचारला.

कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या ब-याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. तरी देखील मास्कचा वापर बंधनकारक आहे. तशातच ओमायक्रॉनची देखील भीती पुढे आली आहे. राज्यातील काही नेते अजूनही सुरुवातीपासून विनामास्क वावरत आहेत. काही नेत्यांनी मास्कचा वापर बंद केला आहे. त्यांच्यावर देखील करावाईचे धाडस दाखवावे अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here