अतिक्रमण विरोधी पथकाच्या चालकाचा प्रताप!- अर्धा तास इंधनाची नासाडी केल्याने जनतेचा संताप!!

जळगाव : जळगाव मनपा अतिक्रमण विरोधी पथकाचा इंधनाचा अपव्यय करण्याचा कारनामा अर्थात प्रताप उघड झाल्यामुळे नागरिकांच्या मनात संतापाची लाट उसळली आहे. जनतेच्या श्रमातून जमा झालेल्या कररुपी पैशांची ही उधळपट्टी असल्याचे या घटनेतून उघड झाले आहे.

अतिक्रमण विरोधी पथकाचे ट्रॅक्टर एकाच जागी गेल्या अर्धा तासापासून सुरु होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर जमलेल्या लोकांनी चालकास धारेवर धरत खडे बोल सुनावले. या अर्ध्या तासात अनेक लिटर डीझलची नासाडी झाली. मीटर वाढवायचे असल्याचे कारण एका कर्मचा-याकडून बोलण्यात आले. त्यामुळे वादात अजूनच भर पडली.

काही वर्षांपूर्वी महसूल विभागातील एका बड्या अधिका-याचा चालक भर उन्हाळ्यात गाडीतील एसीची हवा घेण्यासाठी अर्ध्या तासापासून इंधनाची नासाडी करत असल्याचे लोकांच्या लक्षात आले होते. त्यावेळी सुज्ञ नागरिकांनी त्याला खडे बोल सुनावले होते. त्या घटनेचा व्हिडीओ देखील त्यावेळी समाज माध्यमांमध्ये प्रसारित झाला होता.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here